ITR भरताना आला एरर! टॅक्सपेअरने वाढवून मागितली मुदत

आयकर रिटर्न भरण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी
Income tax return
Income tax returnesakal

आयकर रिटर्न (Income tax return) भरण्यासाठी आता फक्त 3 दिवस उरले आहेत, मात्र आयटीआर (ITR) भरण्यात करदात्याला अडचणी येत आहेत. अनेक करदात्यांनी नवीन आयडी पोर्टलवर (ID portal) आयटीआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ट्विटरवर त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि ITR भरण्यासाठी आणखी वेळ मागितला.

Income tax return
ITR भरण्याचे 8 मोठे फायदे! इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे?

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर 2021 नंतर, मूल्यांकन वर्ष (Assessment year)2021-22 साठी रिटर्न भरण्यासाठी 5,000 रुपये दंड (पेनल्टी)आकारला जाईल. 31 मार्च 2022 नंतर, 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी 10,000 रुपये दंड भरावा लागेल. सरकारने आयटीआर (ITR)भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवून 31 डिसेंबर केली होती. आयटीआर फाइलिंगदरम्यान (ITR filing) तांत्रिक समस्यांचा सामना करणाऱ्या करदात्यांनी आयटीआर फाइल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

Income tax return
करदात्यांनो, क्‍लेमपेक्षा रिटर्न कमी आला? 'हे' आहे कारण

करदात्याने (Taxpayer) ट्विटरवर मांडल्या अडचणी

एका करदात्याने ट्विटरवर सांगितले की, 31 डिसेंबर ही तारीख करदात्यांच्या ऐवजी सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी (Software developers) असायला हवी होती, जेणेकरून या काळात एक चांगले सॉफ्टवेअर विकसित करता येईल आणि करदात्यांना त्यांचा आयटीआर तिथे सहज दाखल करता येईल. दरम्यान, आयकर विभागाने एक निवेदन जारी केले आहे की 27 डिसेंबरपर्यंत 4,67,45,249 आयटीआर भरले गेले आहेत.

सरकार मुदत वाढवणार का?

आता आयटीआर (ITR)भरण्याची अंतिम मुदत (Deadline) वाढवण्याची मागणी करदाते करत असताना, सरकार 31 डिसेंबरनंतरही ही मुदत वाढवण्याचा विचार करत असल्याच्या काही माध्यमांच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com