एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या नफ्यात 31 टक्क्यांची वाढ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई : म्युच्युअल फंडात अग्रगण्य असलेल्या एचडीएफसी या म्युच्युअल फंड हाऊसने 2017-18 या आर्थिक वर्षात घवघवीत नफ्याची नोंद केली आहे.

नफ्यात वाढ

मुंबई : म्युच्युअल फंडात अग्रगण्य असलेल्या एचडीएफसी या म्युच्युअल फंड हाऊसने 2017-18 या आर्थिक वर्षात घवघवीत नफ्याची नोंद केली आहे.

नफ्यात वाढ

एचडीएफसी म्युच्युअल फंडाचा निव्वळ नफा 31 टक्कयांनी वाढून 722.6 कोटी रुपयांवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षात 550.24 कोटींचा नफा नोंदवला गेला होता. कंपनीच्या महसूलात 17.6 टक्कयांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात एकूण 1867.24 कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळाला आहे. एचडीएफसी सध्या 3 लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक हाताळते आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड ही कंपनी एचडीएफसी आणि स्टॅंडर्ड लाईफ इन्व्हेस्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारी कंपनी आहे. 

आयपीओ लवकरच

गेल्या महिन्यात एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला आहे. त्यानुसार  2.54 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यातील 85.92 लाख शेअर्स एचडीएफसी लिमिटेड उपलब्ध करून देईल तर 1.68 कोटी शेअर्स स्टॅंडर्ड लाईफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड उपलब्ध करून देणार आहे.

Web Title: HDFC AMC net profit jumps 31% to Rs 722.6 crore in 2017-18