एचडीएफसी बँकेच्या सीईओंना मिळतो दिवसाचा 2.64 लाख रुपये पगार 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आदित्य पुरी यांच्या वेतनात 10.5 टक्के कपात करण्यात आली आहे. वेतनात 10.5 टक्के कपात होऊनही त्यांचे वर्षाचे वेतन 7.26 कोटी रुपये आहे. शिवाय त्यांच्या वेतनात समाविष्ट असणारे बँकेचे शेअर आणि इतर भत्त्यांमध्ये सुद्धा 4 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांचे  प्रतिदिन 2.64 लाख रुपये वेतन आहे. गेल्यावर्षी त्यांना (2016-17) 8.12 कोटी रुपये वेतन देण्यात आले होते.

मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आदित्य पुरी यांच्या वेतनात 10.5 टक्के कपात करण्यात आली आहे. वेतनात 10.5 टक्के कपात होऊनही त्यांचे वर्षाचे वेतन 7.26 कोटी रुपये आहे. शिवाय त्यांच्या वेतनात समाविष्ट असणारे बँकेचे शेअर आणि इतर भत्त्यांमध्ये सुद्धा 4 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांचे  प्रतिदिन 2.64 लाख रुपये वेतन आहे. गेल्यावर्षी त्यांना (2016-17) 8.12 कोटी रुपये वेतन देण्यात आले होते. पुरी यांचे 4.53 कोटी रूपये मूळ वेतन असून मागील आर्थिक वर्षांच्या (2016) तुलनेत त्यात 15 टक्के वाढ झाली आहे. 

खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठांना मात्र कमी वेतन आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आणि जगातील पहिल्या पन्नास बँकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना 14.25 लाख वार्षिक वेतन आहे. म्हणजेच दरमहा अर्थात 1 लाख 17 हजार रुपये वेतन मिळते. 

Web Title: HDFC Bank MD Aditya Puri earns Rs 2.64 lakh per day

टॅग्स