झाड लागलं गं, झाड लागलं रं...

अजय अतुल यांनी ‘सैराट’साठी केलेल्या एका गाण्याच्या चालीवर, संजय ओरके आणि राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा, घोडेगाव) निर्मित ‘झाड लागलं गं, झाड लागलं रं...’ हे गाणे कालच (५ जून) साजऱ्या झालेल्या ‘पर्यावरण दिना’साठी अतिशय चपखल आहे.
HDFC Mutual Fund decided to implement unique concept for environmental conservation Grow-trees
HDFC Mutual Fund decided to implement unique concept for environmental conservation Grow-treessakal
Summary

अजय अतुल यांनी ‘सैराट’साठी केलेल्या एका गाण्याच्या चालीवर, संजय ओरके आणि राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा, घोडेगाव) निर्मित ‘झाड लागलं गं, झाड लागलं रं...’ हे गाणे कालच (५ जून) साजऱ्या झालेल्या ‘पर्यावरण दिना’साठी अतिशय चपखल आहे.

कोविड महासाथीच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी झालेली परवड कधीही न विसरता येणारी आहे. एक झाड साधारणपणे चार लोकांना ऑक्सिजन देते. अर्थशास्त्रीय विविध घटक लक्षात घेतले, तर १०० वर्षांच्या एका झाडाची किंमत येते तब्बल एक कोटी रुपये! आणि उपलब्ध आकडेवारीनुसार, विविध प्रकल्पांसाठी, मागील वर्षी आपण साधारण ३१ लाख झाडांची कत्तल केली. यामध्ये राहण्यासाठीची घरे बांधताना कापलेल्या झाडांचा समावेश नाही; तसेच अवैधरीत्या कापलेल्या झाडांची आकडेवारी उपलब्ध नाही. पण ती विचारात घेतली तर भारतामध्ये दरवर्षी कोट्यवधी झाडे कापली जातात. मानवजातीच्या रक्षणासाठी एका माणसामागे ५०० झाडांची आवश्यकता आहे. जगामध्ये सरासरी ही संख्या ४५० आहे, तर भारतामध्ये ती आहे अवघी २५!

बहुतेक खासगी स्वयंसेवी संस्था; तसेच अन्य वृक्षप्रेमी, आपापल्या परीने पर्यावरणासाठी कामे करीत असतात. अशीच एक संकल्पना, एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आणली आहे. येत्या १० जूनपर्यंत तुम्ही एक ‘एसआयपी’ केली, तर तुमच्या नावाने एक झाड लावले जाईल. किमान २००० रुपयांची ‘एसआयपी’ किमान तीन वर्षांसाठी करणे आवश्यक राहील. ही ‘एसआयपी’ तुम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही इक्विटी योजनेमध्ये; तसेच गोल्ड फंडामध्ये सुद्धा करू शकता. कागदाचा वापर कमी होऊन पर्यायाने झाडांची कत्तल कमी व्हावी म्हणून ही एसआयपी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करणे आवश्यक असेल. तुमच्यावतीने एक झाड लावल्यानंतर तुमच्या इ-मेल वर त्याचे ‘इ-सर्टिफिकेट’ पाठविले जाईल.

कदाचित एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो, की एचडीएफसी म्युच्युअल फंड ही रोपटी लावल्यानंतर त्याचे संवर्धन करणार आहे का? नाही तर ते असे व्हायचे, की एका नेत्याने वृक्षारोपणाच्या वेळी गंमतीने म्हटले होते, की ते दरवर्षी न चुकता याच ठिकाणी झाडे लावतात. असो. रोपे लावण्याबरोबरच त्यांची निगा राखणे आणि ती जोपासणे हे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच, एचडीएफसी म्युच्युअल फंड झाडे लावण्यासाठी ‘ग्रो-ट्रीज’ या संस्थेशी संलग्न आहे. या संस्थेने आतापर्यंत २३ राज्यांमध्ये एक कोटी झाडे लावली आहेत आणि ते त्यांचे संवर्धन सुद्धा योग्य प्रकारे करीत आहेत.

आता या गुंतवणुकीविषयी थोडेसे. काही गुंतवणूकदारांचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे, की ही सागवानाच्या किंवा तत्सम झाडांमधील गुंतवणुकीची योजना आहे का? कारण काही वर्षांपूर्वी अशाच एका योजनेमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले होते. परंतु, ही गुंतवणूक झाडांमध्ये होणार नसून, ती म्युच्युअल फंडाच्या इक्विटी (शेअर) विभागामध्ये किंवा सोन्यामध्ये होणार आहे. इक्विटी या मालमत्ता विभागाने दीर्घकाळामध्ये इतर कोणत्याही मालमत्ता विभागापेक्षा सरस परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, ही गुंतवणूक तुम्ही ‘एसआयपी’ पद्धतीने करीत असल्याने त्यामधील जोखीम बऱ्याच प्रमाणात कमी होते. आकडेवारी असे दर्शविते, की १० वर्षांच्या काळासाठी केलेल्या ‘एसआयपी’मध्ये तुमचे मुद्दल कमी होण्याची शक्यता ‘शून्य’ होते. त्यामुळेच, आज पाच कोटींच्या वर गुंतवणूकदार ‘एसआयपी’च्या माध्यमातून साधारणपणे ११,००० कोटी रुपये दरमहा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांतर्फे शेअर बाजारामध्ये गुंतवित आहेत.

थोडक्यात, येत्या १० जूनपर्यंत केलेली तुमची एक ‘एसआयपी’ ही एका नव्या झाडाला जन्म देईल आणि तुम्हाला स्वार्थाबरोबर परमार्थ पण साधता येईल. समाजासाठी, पर्यावरणासाठी काहीतरी केल्याचे समाधान देईल. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी; तसेच सोने विभागातील योजनांमधील जोखीम लक्षात घेऊन, तज्ज्ञ व अनुभवी गुंतवणूक सल्लागारांच्या सल्ल्याने या शाश्वत गुंतवणूक संकल्पनेचा फायदा घेणे योग्य वाटते.

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने पर्यावरण संवर्धनासाठी अनोखी संकल्पना राबवायचे ठरविले आहे. येत्या १० जूनपर्यंत तुम्ही एक ‘एसआयपी’ केली, तर तुमच्या नावाने एक झाड लावले जाईल. किमान २००० रुपयांची ‘एसआयपी’ किमान तीन वर्षांसाठी करणे आवश्यक राहील. ही ‘एसआयपी’ तुम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही इक्विटी योजनेमध्ये; तसेच गोल्ड फंडामध्येसुद्धा करू शकता. कागदाचा वापर कमी होऊन पर्यायाने झाडांची कत्तल कमी व्हावी म्हणून ही एसआयपी ‘ऑनलाइन’ पद्धतीने करणे आवश्यक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com