लिस्टिंगच्या दिवशी कोणत्या IPO ने गुंतवणूकरांचे पैसे केले दुप्पट, जाणून घेऊयात सविस्तर...

IPO
IPOIPO

यावर्षी बऱ्याच IPO ची ब्लॉकबस्टर लिस्टिंग झाली आहे. जीआर इन्फ्रा (GR Infra), क्लीन सायन्स (clean science ) आणि तत्व चिंतनने (Tatva Chintan) लिस्टिंगच्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल करत त्यांचे पैसे दुप्पट केले. तत्व चिंतनचा (Tatva Chintan) इश्यू 180 पट सबस्क्राईब झाला होता. जाणून घेऊयात यावर्षी कोणत्या IPO ने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना तगडा परतावा दिला.

जीआर इन्फ्रा (GR Infra)

जीआर इन्फ्राचा इश्यू 103 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 103 टक्के प्रिमियमवर झाली होती. याचा अर्थ लिस्टिंगच्या दिवशी ज्याही गुंतवणुकदारांनी हा IPO घेतला असेल त्यांचे पैसे दुप्पट झाले.

क्लीन सायन्स अँड टेक (Clean Science and Tech)

क्लीन सायन्स अँड टेक कंपनीचा IPO हा 93 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 98 टक्के प्रिमियमवर झाली होती. या IPO मध्येही गुंतवणूक करणाऱ्यांना शानदार परतावा मिळाला.

तत्त्व चिंतन (Tatva Chintan)

तत्त्व चिंतन कंपनीचा इश्यू 108 पट सबस्क्राइब झाला होता आणि याची लिस्टिंग 95 टक्के प्रिमियमवर झाली. हा IPO घेणाऱ्या गुंतवणुकदारांना चांगला फायदा झाला.

IPO
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ!

एमटीआर टेक्नॉलॉजी (MTAR Technologies)

एमटीआर टेक्नॉलॉजी कंपनीचा इश्यू 201 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 85 टक्के प्रिमियमवर झाली.

नजारा टेक्नॉलॉजी (Nazara Technologies)

नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचा इश्यू 176 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 79 टक्के प्रिमियमवर झाली.

इंडिगो पेंट्स (Indigo Paints)

इंडिगो पेंट्स कंपनीचा इश्यू 117 पट सबस्क्राईब झाला आणि याची लिस्टिंग 75 टक्के प्रिमियमवर झाली.

IPO
म्युच्युअल फंडमध्ये नागपूर 'Top 10' मध्ये, देशात ९५०० कोटींची मासिक गुंतवणूक

नुरेका (Nureca)

नुरेका कंपनीचा इश्यू 40 पट सबस्क्राईब झाला आणि याची लिस्टिंग 59 टक्के प्रिमियमवर झाली.

झोमॅटो (Zomato)

झोमॅटो कंपनीचा इश्यू 38 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 51 टक्के प्रिमियमवर झाली.

हेरंब इंडस्ट्रीज (Heranba Industries)

हेरंब इंडस्ट्रीजचा इश्यू 83 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 44 टक्के प्रिमियमवर झाली.

रोलेक्स रिंग्स (Rolex Rings)

रोलेक्स रिंग्सचा इश्यू 130 पट सबस्क्राईब झाला होता आणि याची लिस्टिंग 39 टक्के प्रिमियमवर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com