आता नवीन घर घेणे झाले सोपे!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते.

 पुणे: स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते. नवीन घराचा शोध सुरु करण्यापूर्वी त्याच्यासाठी पैशांची उभारणी कशी करणार हे आधी निश्चित करण्याची गरज असते. यासाठी सुरुवातीला आपले नेमके 'बजेट' ठरवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्या प्रकारची मालमत्ता तुम्हाला परवडेल हे निश्चित करता येते. याशिवाय ब्रोकर्स, रिअल इस्टेट एजंट्स, बँकांचे उच्च व्याज दर आणि त्यासोबतच तुमच्या बजेटनुसार योग्य अपार्टमेंटची निवड या सर्व बाबी सोप्या नसतात.

आता 'बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड'ने 'होम्स आणि लोन्स'सोबत नवीन घराच्या खरेदीची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि जलद केली आहे. बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड नवीन घराची खरेदी करणार्‍यांना एकाच ठिकाणाहून गृह खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरेदी करायाची संभाव्य घरे शॉर्टलिस्ट करुन खरेदीसाठी आवश्यक पैसा सहजपणे उभा करता येऊ शकतो. इतकेच नव्हे तर, तुम्हाला घराची कागदपत्रेही उपलब्ध करुन देण्यास सहाय्य करण्यात येते.

 हाउसिंग सोल्युशन कशाप्रकारे उपयोगी ठरते?

योग्य घराची निवड: 
 कुटुंबासासाठी सर्वोत्तम घर शोधणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे होम्स आणि लोन्स अशा प्रॉपर्टीजची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर देऊन घर शोधण्याच्या त्रास कमी केला आहे. या वेबसाईटवर शहराची निवड करून पाहिजे त्या ठिकाणची प्रॉपर्टी शोधता येते . वेबसाईटवरील मॅपचा वापर करुन तुमच्या पसंतीचा विभाग नॅविगेट करा आणि तुम्हाला हव्याशा वाटणार्‍या प्रॉपर्टी लिस्टींगवर क्लिक करुन त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

हे पोर्टल तुम्हाला बिल्डर आणि प्रॉपर्टीबाबत माहिती देते. यासह त्या परिसरात उपलब्ध असणार्‍या सुविधा, शाळा, रुग्णालये, बँका, सुपरमार्केट्स तसेच धार्मिक स्थळांचीही माहिती उपलब्ध आहे. तुम्ही जिम्नॅशिअम, क्लब हाउस, खेळाचे मैदान, जलतरण तलाव, 24 तास पॉवर बॅक अप यासारख्या सुविधांचा आढावा घेउन प्रॉपर्टी खरेदीबाबत अंतिम निर्णय घेऊ शकता. तुम्हाला आवडलेल्या प्रॉपर्टीज शॉर्टलिस्टेड करुन त्यांच्यावरही दृष्टीक्षेप टाकू शकाल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आणखी काही क्लिक्स करुन तुम्हाला सर्वाधिक आवडलेल्या साईटला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी विनंतीही नोंदवू शकाल. बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता त्यांच्या अधिकृत आणि तज्ज्ञ एक्झिक्युटिवसोबत प्रॉपर्टी साईटला भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे.

तीन कोटी रुपयांपर्यंत जलद कर्ज 

या वेबसाईटवर अपार्टमेंट कॉन्फिगरेशन, त्यांच्या किंमती, प्रारंभिक ईएमआय याबाबत माहिती देणार्‍या प्रॉपर्टीजही लिस्टेड करण्यात आल्या आहेत. या पध्दतीने तुम्ही तुमच्या बजेटनुसार घर खरेदीचे नियोजन अगदी प्रारंभापासून करु शकता. आता घर खरेदीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची गरज नाही कारण होम्स आणि लोन्स तुम्हाला होमलोन द्वारे 3 कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन देत आहे. यासाठी दीर्घ मुदत आणि किफायतशीर व्याज दरच आकारण्यात येईल. तुम्हाला अतिरिक्त पार्किंग स्पेस किंवा जिम मेंबरशिपसाठी तसेच घरामध्ये काही सुधारणा करण्यासाठी अधिक पैशांची गरज असेल तरीही हाय व्हॅलू टॉप अप लोनची सुविधाही उपलब्ध आहे. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुम्ही तुमच्या कर्जाचे प्रिपेमेंट किंवा फोरक्लोजही करु शकता.

कर्ज घेण्यासाठी मदत

घर खरेदीची संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा एक प्रतिनिधी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तुम्हाला मदत करेल. त्याच्या मदतीने घर खरेदीबाबतच्या सर्व कागदपत्रांची औपचारिकता अगदी सहज पध्दतीने पूर्ण करता येतील. होम्स अँड लोन्स सोबत घर मालमत्ता खरेदीची संपूर्ण प्रक्रिया चिंता आणि तणावमुक्त झाली आहे. तुम्हाला केवळ 72 तासांच्या आत तुमचे गृह कर्ज उपलब्ध होते. यासाठी फक्त कस्टमाईज्ड डिल वापरुन तुमची प्रि-अ‍ॅप्रुव्हड ऑफर तपासावी लागेल.

आता अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेणे सोपे झाले आहे. फक्त आता निवड करा ती फक्त घर घेण्याच्या प्रक्रियेत सतत तुमच्या बरोबर असणाऱ्या बँकेची किंवा फायनान्स कंपनीची. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Here's How The Home-Buyers Journey Is Easier Than Ever