BS-III वाहनांवरील बंदीनंतर हीरो, होंडाकडून सवलत

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

हीरो मोटोकॉर्पने 12 हजार 500 रुपयांपर्यंत तर प्रिमीयम मोटारसायकलच्या किमतीवर 7 हजार 500 रुपयांपर्यंतची सूट दिली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बीएस-III वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑटो कंपन्यांकडून मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर आणि हीरो मोटोकॉर्पकडून दुचाकी वाहनांवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे.

बीएस-III प्रकारातील स्कूटरवर हीरो मोटोकॉर्पच्या वतीने 12 हजार 500 रुपयांपर्यंत तर प्रिमीयम मोटारसायकलच्या किमतीवर 7 हजार 500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. हीरो मोटोकॉर्पने ऍक्टिव्हा आणि शाईन या दुचाकी वाहनांवर सवलत दिली आहे.

वाहनांच्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी 1 एप्रिलपासून बीएस-IV ही नवी मानके लागू होणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील अखेरच्या दोन दिवसांसाठी सवलत देण्यात आली आहे. 1 एप्रिलनंतर आता बीएस-III च्या वाहनांच्या खरेदी विक्रीवर बंदी येणार आहे. त्यामुळे होंडा आणि हीरो या दोन्ही कंपन्यांनी सवलत जाहीर केली आहे.

आज मुंबई शेअर बाजारात हीरो मोटोकॉर्पचा शेअर 3231.5 रुपयांवर व्यवहार करत 08.25 रुपयांनी वधारून बंद झाला.

Web Title: Hero, Honda offer discount on BS-III vehicles