ईपीएफ, टीसीएस संदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांनी काय केल्या घोषणा...

वृत्तसंस्था
Wednesday, 13 May 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे  12 टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे 12  टक्क्याचा भार सरकार उचलणार 

भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे 12 टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे 12 टक्क्याचा भार सरकार उचलणार

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

-मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरकार पीएफ भरणार आहे. त्यात आणखी तीन महिन्यांनी वाढ.

आता  जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पीएफचा भार सरकार उचलणार

-उद्योगांना 2500 कोटी रुपयांचा फायदा होणार

- 3.67 लाख कंपन्यांना थेट फायदा मिळणार

- कंपन्यांमधील 72.22 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार

संकटातील रिअल इस्टेटला सरकारचा दिलासा

करदात्यांना दिलासा

उद्गम कर (टॅक्स डीडक्शन अँट सोर्स - टीडीएस) आणि टॅक्स कलेक्शन अँट सोर्समध्ये कराच्या दरात 25 टक्के कपात करण्यात आली आहे. 
यामध्ये करार, प्रोफेशनल फी, व्याज, भाडे, लाभांश, कमिशन, ब्रोकरेज हे कमी केलेल्या टीडीएससाठी पात्र असतील.

उद्योजकांसाठी महत्त्वाची बातमी : लघु व मध्यम उद्योगाचं चित्र बदलणार!

ही कपात चालू आर्थिक वर्षात 14 मे पासून 31 मार्च 2021 पर्यंत लागू असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highlights for Finance Minister Nirmala Sitharaman announcement for EPF, TDS