Hindenburg Adani Row : अदानी-हिंडेनबर्ग वादावर SC चे SEBI ला महत्त्वपूर्ण निर्देश

यावेळी न्यायालयाने भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
Adani Hindenburg Row
Adani Hindenburg Row Sakal

Hindenburg Research-Adani Row : हिंडनबर्ग-अदानी प्रकरणी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यावेळी न्यायालयाने भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच हिंडनबर्ग अहवालाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवार १३ फेब्रुवारीपर्यंत अर्थ मंत्रालय आणि सेबीकडून उत्तर मागितले आहे.

Adani Hindenburg Row
PM Modi Mumbai Visit : मानलचं पाहिजे राव! एका दमात PM मोदींनी घेतली सर्व तीर्थस्थानांची नावं

सर्वोच्च न्यायालयाने सेबीला भविष्यात गुंतवणूकदारांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची आणि सध्याची चौकट काय आहे हे न्यायालयाला सांगण्याचे आदेश दिले आहेत. नियामक चौकट कशी मजबूत करायची हेदेखील सेबीने सांगावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता याप्रकरणी सोमवारी (१३ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.

Adani Hindenburg Row
Kasaba Bypoll Election : माघार नाही कसबा आम्हीच जिंकणार, आनंद दवेंचा विश्वास

हिंडेनबर्ग रिसर्चचा इतिहास :

हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. ६ मे १९३७ रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून कंपनीला नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मँचेस्टर टाऊनशिपमध्ये हा अपघात झाला होता. हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्याही कंपनीत होणारे घोटाळे शोधून काढते आणि नंतर त्याबद्दलचा अहवाल प्रकाशित करते. ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com