
Kasaba Bypoll Election : माघार नाही कसबा आम्हीच जिंकणार, आनंद दवेंचा विश्वास
Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. काँग्रेस मधून बंडखोरी केलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर आणि आम आदमी पक्षाचे किरण कद्रे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी अर्ज मागे घेणार अशा चर्चा होत्या.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मात्र, आम्ही अर्ज मागे घेणार नाही आम्ही निवडणूक जिंकण्यावर ठाम असून अर्ज मागे घेण्याचा विचार कधीच केला नव्हता, असे प्रतिपादन आनंद दवे यांनी केले आहे.
टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर आमच्यासाठी अजून सोयीचे वातावरण झाले आहे. जुने वाडे, इमारती, आर्थिक आरक्षण आणि पून्येश्र्वर मुक्त आणि सुंदर कसबा कसा दिसेल यासाठी पोटनिवडणूक लढवणार, असे आनंद दवे म्हणाले.
राहुल कलाटेंनी नाना काटेंविरोधात लढवणार निवडणूक
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच चालू होती मात्र राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादीतून इच्छूक असलेले राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आज शिवसेनेचे नेते आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेऊन कलाटे यांची समजूत काढली सोबतच.
आहिर यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप राहुल कलाटे यांना दिला आणि उद्धव ठाकरे , राहुल कलाटे यांचं फोन वरून बोलनं करून दिलं त्यांनंतर ही राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. मात्र राहुल कलाटे यांचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना बसण्याची शक्यता आहे.