हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांची पाठ 

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

भारतातली संरक्षण सामुग्रीच्या क्षेत्रातली सरकारी मालकीची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स(एचएएल) कंपनीने आयपीओ बाजारात आणला एचएएलच्या पब्लिक ऑफरला मोठा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता होती. मात्र सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या आयपीओकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले नाहीत

मुंबई : भारतातली संरक्षण सामुग्रीच्या क्षेत्रातली सरकारी मालकीची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स(एचएएल) कंपनीने नुकताच आयपीओ  बाजारात आणला एचएएलच्या पब्लिक ऑफरला मोठा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता होती. मात्र सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या आयपीओकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले नाहीत. या आयपीओकडे मुख्यत्वेकरून नोंदणीकृत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओढा दिसून आला. लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांना मात्र यात फारसा रस दाखवला नाही. 

तज्ज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात असलेल्या निरूत्साही आणि नकारात्मक वातावरणाचाही परिणाम आयपीओवर झाला. त्यातही मात्र भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्यच्युअल फंडानी याकडे आपला मोर्चा वळवला. त्यातुलनेत परदेशी गुंतवणूकदार मात्र यापासून लांबच राहिले.

एचएएलचा आयपीओ 16 मार्च ते 20 मार्चदरम्यान खुला होता. एचएएल आयपीओच्या माध्यमातून एकूण 3,41,07,525 शेअर्सच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले होते. कंपनीने आयपीओसाठी 1,215 ते 1,240 रुपये प्रति शेअर किंमतपट्टा केला होता. 

एचएएल आपीओमागे सरकारचे 2017-18 साठीचे निर्गुंतणूकीचे धोरण आहे. कंपनी वेगवेगळ्या संरक्षण सामुग्रीची रचना आणि निर्मिती करते. त्यात लढाऊ विमान, हेलिकॉप्टर्स, विमानांचे इंजिन आणि सुटे भाग इत्यादीचा समावेश आहे. ही कंपनी मुख्यत्वेकरून भारतीय लष्करासाठी संरक्षण सामुग्री बनवते. एचएएल सध्या एसयू -30 एमकेआय, हॉक-एजीटी, लाइट कॉम्बॅट विमान (एलसीए), डीओ -228 विमान, ध्रुव-एएलएच आणि चितळ हेलिकॉप्टर, जगुआर, किरण एमकेआई / आयए / इई, मिराज, एचएस -748, एएन 32, मिग 21, सु -30 एमकेआय, डीओ -228 विमान आणि एएलएच, चीता / चेतक हेलिकॉप्टर अशा विविध हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्टची निर्मिती करते.

Web Title: Hindustan Aeronautics IPO subscribed 99% on final day