...तर एअर इंडियामध्ये रचला जाऊ शकतो इतिहास!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 December 2020

आता ‘एअरलाइन्स’चे कर्मचारीदेखील मोठ्या कर्जाखाली दबलेल्या ‘एअर इंडिया’ला खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत.  टाटा सन्स, एस्सार ग्रुप आणि स्पाइसजेट व्यतिरिक्त एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटानेदेखील ‘एअर इंडिया’ची खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओआय) दिले आहे. असे झाल्यास कॉर्पोरेट इतिहासामधील ही पहिली घटना असेल, जेव्हा एखादी सरकारी कंपनी त्याच कंपनीचे कर्मचारी खरेदी करतील.

‘एअरलाइन’च्या कर्मचाऱ्यांचीही खरेदीसाठी बोली
नवी दिल्ली - आता ‘एअरलाइन्स’चे कर्मचारीदेखील मोठ्या कर्जाखाली दबलेल्या ‘एअर इंडिया’ला खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत. 

टाटा सन्स, एस्सार ग्रुप आणि स्पाइसजेट व्यतिरिक्त एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटानेदेखील ‘एअर इंडिया’ची खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओआय) दिले आहे. असे झाल्यास कॉर्पोरेट इतिहासामधील ही पहिली घटना असेल, जेव्हा एखादी सरकारी कंपनी त्याच कंपनीचे कर्मचारी खरेदी करतील.  ‘एअर इंडिया’च्या या कर्मचाऱ्‍यांनी अमेरिकी प्रायव्हेट इक्विटी फर्म ‘इंटरॲप्स इंक’समवेत एअरलाइन्सच्या ५१ टक्के भागभांडवलासाठी बोली लावली आहे. एअर इंडिया खरेदी करण्यासाठी पुढे आलेल्या या प्रत्येक कर्मचाऱ्याला बोलीसाठी एक लाख रुपये देण्यास सांगितले जाईल. या प्रक्रियेचे नेतृत्व एअर इंडियाच्या संचालक मीनाक्षी मलिक करीत आहेत. जुने कर्मचारी या मोहिमेस पूर्ण सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी २०० हून अधिक कर्मचारी एकत्र आले आहेत. प्रत्येकाकडून एक लाख रुपये उभे केले जाणार आहेत. एअर इंडियामध्ये एकूण १४ हजार कर्मचारी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- मुख्य बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एअर इंडिया’वर ६० हजार कोटींचे कर्ज
‘एअर इंडिया’मधील १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने बोली मागविल्या आहेत. सरकारने यावेळी ‘एअर इंडिया’च्या विक्रीच्या अटी बदलल्या आहेत. त्याअंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील १०० टक्के हिस्सेदारी विकली जाईल. सद्यःस्थितीत एअर इंडियावर ६०,०७४ कोटी रुपयांचे कर्ज आहे, परंतु अधिग्रहणानंतर खरेदीदाराला केवळ २३,२८६.५ कोटी रुपये द्यावे लागतील. उर्वरित कर्ज, स्पेशल पर्पज व्हेइकल एअर इंडिया ॲसेट होल्डिंग्ज लि.कडे हस्तांतरित केले जाईल, अर्थात बाकीच्या कर्जाचे ओझे सरकार उचलणार आहे.

Gold Price - सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ

टाटा समूहानेदेखील लावली बोली!
टाटा समूहाने ‘एअर इंडिया’ला खरेदी करण्यात रुची दाखविली असून, त्यांनीदेखील यासाठी बोली लावली आहे. टाटा समूहाने ही बोली जिंकल्यास ‘एअर इंडिया’ची ६७ वर्षांनंतर ‘घर वापसी’ होऊ शकेल. टाटा समूहाने ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने ऑक्टोबर १९३२ मध्ये ‘एअर इंडिया’ची सुरुवात केली होती. नंतर १९५३ मध्ये केंद्र सरकारने त्याला ताब्यात घेतले.

लॉकडाउनमुळे वाहनउद्योग पंक्चर; ३ लाख ४५ हजार लोकांचा रोजगार गेला 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: history made in Air India auction