गृहकर्ज व्यवसायाला रोकड टंचाईची झळ 

गृहकर्ज व्यवसायाला रोकड टंचाईची झळ 

नवी दिल्ली - बिगर बॅंकिंग वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोकड टंचाईने गृहकर्ज व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. चालू वर्षात गृहकर्ज  वितरणाचा वृद्धिदर जेमतेम १३ ते १५ टक्‍के राहील, असा अंदाज एका अहवालात व्यक्त केला आहे. 

गृहकर्ज वितरणाच्या वृद्धिदराचा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी स्तर आहे. त्याशिवाय गृहकर्ज फेडीवरदेखील परिणाम झाला असून, भविष्यात हौसिंग फायनान्स कंपन्यांच्या बुडीत कर्जांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे. 

रोख टंचाईने हौसिंग फायनान्स कंपन्यांसाठी व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. ‘आयसीआरए’ या पत मानांकन संस्थेच्या अहवालानुसार, चालू वर्षात गृहकर्ज वितरणाचा वृद्धिदर १३ ते १५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तीन वर्षांपूर्वी कर्ज वितरणाचा वृद्धिदर १७ टक्के होता. मात्र, सप्टेंबरपासून बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना विविध समस्यांनी घेरले असल्याने त्याचा थेट फटका कर्ज वितरणाला  बसला आहे. 

रिलायन्स, डीएचएफएल यांसारख्या हौसिंग फायनान्स कंपन्यांचा चालू वर्षातील वृद्धिदर १० टक्‍क्‍यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत बॅंकांकडून गृहकर्जांची मागणी पुरवली जात आहे. बॅंकांचा गृहकर्जातील वृद्धिदर १९ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. 

बुडीत कर्जे वाढण्याचा धोका 
एनबीएफसी कंपन्या आणि हौसिंग फायनान्स कंपन्यांनी वितरित केलेल्या गृहकर्जांची वसुली संथ गतीने सुरू आहे. मार्चअखेर बुडीत कर्जांचे प्रमाण १.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. या कंपन्यांचे बाजारात १९.१ लाख कोटींची कर्जवसुली शिल्लक आहे. नजीकच्या काळात बुडीत कर्जांचे प्रमाण १.८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल. परवडणाऱ्या घरांबाबतची कर्जफेड समाधानकारक असल्याचे ‘आयसीआरए’ने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com