Joint Home Loan : स्वप्नातल्या घरासाठी पैसे कमी पडताय? असं करा ज्वाइंट होम लोनसाठी अप्लाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Loan

Joint Home Loan : स्वप्नातल्या घरासाठी पैसे कमी पडताय? असं करा ज्वाइंट होम लोनसाठी अप्लाय

How To Apply For Joint Home Loan : स्वतःचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण बँकेकडून होम लोन घेतात. मात्र, अनेकदा स्वप्नातील घर घेण्याासाठी कर्जाची रक्कम कमी पडते. त्यावेळी नेमकं काय कराव हे कळत नाही.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

Home

Home

घरासाठी बँकेकडून मिळणारे कर्ज हे तुमच्या सॅलरीवर अवलंबून असते. जर, तुमचा पगार कमी असेल तर, बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाची रक्कम कमी असू शकते. त्यामुळे बऱ्याच जणांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, जर घर घेण्यासाठी रक्कम कमी पडत असेल तर, तुम्ही ज्वॉइंट होमलोनसाठीदेखील अप्लाय करू शकता.

जर, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तरीदेखील बँकेकडून कर्ज घेताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज आपण ज्वॉइंट होमलोन म्हणजे काय आण त्यासाठी कसा अर्ज करायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ज्वॉइंट होमलोन म्हणजे काय?

ज्वाइंट होमलोन म्हणजे असे कर्ज जे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत घेऊ शकता. बहुतेक लोक अशा कर्जाची रक्कम भावंडांसह किंवा पती-पत्नीसह घेतात. ज्वॉइंट कर्जातही कलम 24 आणि कलम 80C नुसार कर कपातीचा लाभ घेता येतो.

एवढेच नव्हे तर, यासोबत १.५ लाख आणि २ लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतींचाही लाभ घेता येतो. काही बँका कमी व्याजदरात ज्वॉइंट होमलोन देतात.

क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत बँकेकडून ज्वाइंट होमलोन घेणार आहात. त्यापूर्वी त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे अत्यंत गरजेचे आहे. जर, त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर, बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकते.

कसा करावा अर्ज?

तुम्हाला बँकेत ज्वाइंट होमलोनसाठी अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. यानंतर, तुमचा आणि तुमच्यासोबत या कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. सर्व कागदपत्रांची खातजमा केल्यानंतरच कर्जासाठी अप्लाय केलेला अर्ज मंजूर केला जातो.