No Bath In Winter : आता घ्या आंघोळीची गोळी! हिवाळ्यात नियमित आंघोळ न करण्याचे आहेत फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Bath

No Bath In Winter : आता घ्या आंघोळीची गोळी! हिवाळ्यात नियमित आंघोळ न करण्याचे आहेत फायदे

No Bath Benefits In Winter Season : हिवाळा सुरू होताच घरातील लहान मुले, वडीलधारी मंडळीही आंघोळ करण्यास नकार देतात. कडाक्याच्या थंडीत लोकांना सकाळी लवकर आंघोळ करावीशी वाटत नाही. असे बरेच लोक आहेत जे हिवाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच अंघोळ करतात. रोज अंघोळ केल्याने आपल्या शरीराला हानी पोहोचते, असेही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

Bathing Tips

Bathing Tips

अनेकदा तुम्ही ऐकले असेल की, रोज आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात रोज आंघोळ न करण्याचे फायदे सांगणार आहोत. हिवाळ्यात तुम्ही रोज आंघोळ केली तर, तुमची त्वचा अ‍ॅलर्जीची शिकार होऊ शकते. कारण हिवाळ्यात रोज अंघोळ केल्याने त्वचेत गरजेपेक्षा जास्त ओलावा निर्माण होऊ शकतो. चला तर मग, जाणून घेऊया की, हिवाळ्यात दररोज आंघोळ न करण्याचे नेमके फायदे कोणते?

हेही वाचा: Ginger In Tea : फक्कड चहासाठी नेमकं आलं टाकायचं कधी? पाणी गरम झाल्यावर की, उकळी आल्यावर

त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अनेक अभ्यासांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे जर एखादी व्यक्ती व्यायामशाळेत जात नसेल, धुळीत जात नसेल तर, अशा व्यक्तींना रोज आंघोल करण्याची अजिबात गरज नाही.

रोज आंघोळीमुळे त्वचा होते कोरडी

साधारणपणे हिवाळ्यात लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण, जास्त वेळ गरम पाण्यात अंघोळ केल्याने त्वचेचे नुकसान होते. कडक तापलेल्या पाण्यामुळे आंघोळ केल्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते.

हेही वाचा: Winter Clothes Drying Tips: थंडीच्या दिवसांत कमी ऊन्हात कपडे कसे वाळवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

गरम पाण्यामुळे शरीरातून नैसर्गिक तेल कमी होते. शरीरातील नैसर्गिक तेल शरीराला आर्द्रता आणि संरक्षित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर 5 ते 8 मिनिटांत आंघोळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

नखांना होते नुकसान

हिवाळ्यात रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने नखांचे नुकसान होते. आंघोळ करताना, आपली नखे पाणी शोषून घेतात आणि नंतर ते मऊ होतात आणि तुटतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने नखांमधील नैसर्गिक तेल निघून जाते, त्यामुळे ते कोरडे आणि कमकूवत होतात.

हेही वाचा: Winter Tips : हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे काय आहे फायदे?

इम्युनिटीवर होतो परिणाम

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर तुम्ही हिवाळ्यात रोज आंघोळ केल्यास याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होते.

पाण्याची होते बचत

जर, तुम्ही रोज आंघोळ केली नाही तर, यामुळे तुम्ही पाण्याचीदेखील बचत करता. एका अभ्यासानुसार, रोज एका व्यक्तीच्या आंघोळीसाठी दररोज 55 लिटर पाणी वाया जाते.

हेही वाचा: हिवाळ्यात नवजात बाळाची अशी घ्या काळजी

गुड बॅक्टेरियांचा होतो खात्मा

तज्ज्ञांच्या मते, आपली त्वचेत चांगले बॅक्टेरिया तयार होतात जे शरीराला निरोगी ठेवतात आणि केमिकल टॉक्सिनपासून रक्षण करतात. रोज अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरियादेखील निघून जातात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते, असे मत जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. सी. ब्रॅंडन मिशेल यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BathroomBathColdWinter