गृह मंत्रालयाकडून "इन्फोसिस फाउंडेशन'ची नोंदणी रद्द 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

नवी दिल्ली: परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाने बंगळूरस्थित "इन्फोसिस फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) नोंदणी रद्द केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. फॉरेन कॉट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अर्थात एफसीआरएचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

परदेशातून निधी स्वीकारण्यासाठी सर्व एनजीओंना परकी निधी नियमन कायद्याअंतर्गत (एफसीआरए) नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेली काही वर्षे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वारंवार सूचना करूनही "इन्फोसिस फाउंडेशन'ने परकी निधीसह वार्षिक उत्पन्न व खर्चासंबंधीचा तपशील सादर करण्यास टाळाटाळ केली आहे. "इन्फोसिस फाउंडेशन'ने नियमांचे पालन न केल्याने गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी या एनजीओला कारणे दाखवा नोटीस बजावली देखील होती. मात्र, त्यास फाउंडेशन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाने या एनजीओची नोंदणी रद्द केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. 

इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली होती. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत.शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, कला आणि संस्कृती आणि निराधार लोकांची  काळजी करणाऱ्या प्रकल्पांना साह्य करण्याचे काम इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Ministry cancels registration of Infosys Foundation over FCRA violation