काउंटरवर बुक केलेलं तिकीटही करता येणार रद्द

प्रमोद सरवळे
Thursday, 26 November 2020

सोशल डिस्टंसिंगचे नियम लक्षात घेऊन रेल्वेने कोरोना काळात एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे

नवी दिल्ली: बऱ्याचदा कुठंतरी जाण्यासाठी आपण रेल्वे तिकीट बुक करत असतो पण कधीकधी काही कारणास्तव आपलं जाणं रद्द होत असतं. त्यामुळे जर तिकीट ऑनलाइन काढलं असेल तर ते कॅन्सल करता येत होतं. पण आता कोरोनाकाळात रेल्वेने काही नियमांत बदल केले आहेत, ज्यांचा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे. सध्या काउंटरवर आरक्षित केलेले तिकीटही तुम्हाला रद्द करता येऊ शकणार आहे.

सोशल डिस्टंसिंगचे नियम लक्षात घेऊन रेल्वेने कोरोना काळात एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्याअंतर्गत तुम्ही आता घरी बसून काउंटरवरून घेतलेले तिकीटही रद्द करू शकता. पण त्याचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काउंटरवर जावे लागेल.

काय आहे IRCTCचा नियम-
IRCTC वर ऑनलाइन तिकीट रद्द केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता तिकीट रद्द करण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं रहावं लागणार नाही. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तिकीट खरेदी करताना तुम्हाला तुमचा वैध मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. जर तुम्ही तिकीट काढताना तुमचा योग्य नंबर दिला नाही किंवा नंबर देताना चूक केली तर तुम्ही काउंटरवरून  घेतलेले तिकीट ऑनलाईन रद्द करता येणार नाही.

अशाप्रकारे तुम्ही तुमचे ऑनलाइन तिकीट रद्द करु शकाल-
-सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf या लिंकवर क्लिक करुन IRCTCच्या वेबसाइटवर जावं लागेल.

- त्या पेजवर गेल्यावर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल.

- त्यानंतर टिक बॉक्समध्ये टिक करुन तुम्हाला सबमिट करावे लागेल.

- नंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, जो तिथं टाकावा लागेल. महत्वाचे म्हणजे हा ओटीपी त्याच नंबरवर येईल जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला आहे.

- तिथं जाऊन तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला याचं रिफंड काउंटरवर मिळणार आहे.  

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर वॅलिडेट करावा लागणार आहे. त्यानंतर त्या पीएनआरचे सगळे डिटेल्स समोरील स्क्रिनवर दिसतील. डिटेल्स पडताळून पाहिल्यानंतर तुमच्यासमोर Cancel Ticket असा ऑप्शन दिसेल. ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे तिकीट कॅन्सल होणार आहे. तुमची जी रिफंडची अमाउंटची आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, त्याचा फोटोही तुम्हाला तिथं मिळू शकेल. नंतर तुम्ही तुमचं तिकीट घेऊन पीआरएस काउंटरला गेला तर तिथं तुम्हाला तुमचा रिफंड मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to cancel railway ticket online taken on counter