Video कर न चुकवता कसे व्हाल श्रीमंत?

Bhushan-Godbole
Bhushan-Godbole

अमित आणि विजय हे दोघे ही चांगले मित्र आहेत. ऑफिसमधून निघाल्यावर दोघांची अर्थसंकल्प २०२० वर चर्चा सुरू झाली. दोघेही शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्यामुळे, साहजिकच नवीन करप्रणालीबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते. अमितला अपेक्षा होता, की यंदाच्या बजेटमध्ये अल्पकालीन भांडवली लाभावर कर (एसटीसीजी) सवलत वाढावी तसेच दीर्घकालीन भांडवली लाभ कर (एलटीसीजी) रद्द केला जावा. परंतु तसे झाले नाही. म्हणून अमित निराश होता. पण ‘एसटीसीजी’ आणि ’एलटीसीजी’ आहे तरी काय, जाणून घेऊया.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स (एसटीसीजी)                        

  • एका वर्षाच्याआत शेअरची खरेदी-विक्री केल्यास त्यावर ‘एसटीसीजी’ भरावा लागतो. 
  • शेअर विक्रीतून झालेल्या नफ्यावर १५ टक्के कर

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स (एलटीसीजी) 

  • एका आर्थिक वर्षात एकावर्षापेक्षा जास्त काळ शेअर तसेच ठेवून केलेल्या विक्रीवरील नफ्यावर भरावा लागतो
  • शेअरच्या विक्रीवरील नफा एक लाखांहून अधिक असेल तर एक लाखापेक्षा जास्त होणाऱ्या लाभावर दहा टक्के कर

जर शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येकाने वॉरेन बफे यांचा गुंतवणुकीचा मार्ग आत्मसात करावा. बफे ‘एक चतुर गुंतवणूकदार’ आहेत. त्यांना हे नेमके ठाऊक आहे की ‘लाँग टर्म’ गुंतवणूक कधी, कोठे आणि किती करावी. जर आपल्याला शेअर विक्रीतून नफा झाला तर आपल्यला त्या नफ्यावर ‘एलटीसीजी’ भरावा लागेल.  बफे यांनी काही कंपन्यांची दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निवड केली ज्या कंपन्यांचे शेअर ते कधीच विकत नाहीत. ज्याबद्दल ते म्हणतात की, हे शेअर्स ते कायमस्वरुपी पोर्टफोलिओमध्ये ठेवणार आहेत  उदा. कोका कोला. यामुळे शेअरची दीर्घकाळात किंमत वाढल्याने  त्यांची संपत्ती वाढलेली दिसते. तसेच जर शेअर विकलेच नाहीत तर कर भरण्याचे कारणच काय?अशा केलेल्या गुंतवणुकीमुळे कर न भरता वॉरेन बफे यांची मालमत्ता वाढलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांचे शेअर दीर्घकाळासाठी त्यांनी घेतले त्याच्या मिळणाऱ्या लाभांशातून बफे उत्तम कमाई करतात. 

बाजाराचे मूल्याकंन पाहून दीर्घकाळासाठी योग्य कंपन्यांचे शेअर टप्याटप्याने खरेदी केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीवर योग्यवेळेस नफा घेऊ शकता किंवा बफेंप्रमाणे दीर्घकालीन गुंतवणुकीचा करमुक्त फायदा घेता येऊ शकतो. तसेच आवश्‍यकतेनुसार काही कंपन्यांमधील जोखीम आणि बाजाराचे मूल्याकंन बघून ‘शॉर्ट टर्म ट्रेडिंग’ केल्यास उत्तम नफा मिळवून आणि ‘एसटीसीजी’ देऊन आनंदाने म्हणू शकता ’Happy Trading Happy Investing.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com