Budget 2019 : गोपनीयता पाळण्यासाठी 'ही' घेतली जाते खबरदारी

Budget 2019 : गोपनीयता पाळण्यासाठी 'ही' घेतली जाते खबरदारी

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली:  येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर लोकप्रिय घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया…!

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थ खात्यात स्वतंत्र विभाग आहे. सामान्यपणे अर्थसंकल्पाची तयारी आदल्या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुरु होते, म्हणजे अर्थसंकल्पाची तयारी ते सादरीकरण यासाठी वर्षातील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी यात जातो. सर्वात आधी सर्व मंत्रालयांना, राज्यांना आणि स्वायत्त संस्थांना पुढच्या वर्षीच्या खर्चाचा आराखडा सादर करण्याची सूचना दिली जाते आणि हा आराखडा मिळाल्यानंतर मंत्रालयांशी त्यावर सल्लामसलत केली जाते. याचबरोबर शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, अर्थतज्ज्ञ आणि सामान्य लोकांचं मत घेतलं जात. 

साधारणपणे डिसेंबर महिन्यात अर्थसंकल्पाचा 'first cut' म्हणजेच कच्चा आराखडा तयार केला जातो. हा कच्चा आराखडा नेहमी निळ्या कागदावरच बनवला जातो. बऱ्याच बैठकांनंतर हा आराखडा निश्चित केला जातो आणि मग अर्थमंत्र्यांकडून कर प्रस्तावावर (Tax proposal) निर्णय घेतला जातो.

अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेतली जाते. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाला थोडक्यात अर्थसंकल्पामधील तरतुदींविषयी सांगितले जाते. अर्थसंकल्पीय भाषणाबरोबर हा अर्थसंकल्प राज्यसभेत देखील मांडला जातो. मोदी सरकारच्या काळात रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याची पद्धत बंद करण्यात आली. 

या भाषणाचे दोन भाग असतात –
1) सर्वसाधारण आर्थिक सर्वेक्षण आणि धोरण
2) कर प्रस्ताव

 या अर्थसंकल्पावर सभासदांच्या चर्चा आणि भाषणानंतर विनियोजन विधेयक (Appropriation Bill) मांडले जाते आणि त्यावर मतदान घेतले जाते अर्थातच या सगळ्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो.

अर्थसंकल्प लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात संमत होऊन 75 दिवसांच्या आत राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण होते. 

अर्थसंकल्पाची गोपनीयता जपण्यासाठी... 
अर्थसंकल्प तयार करणे ही अतिशय किचकट आणि देशाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण प्रक्रिया असते. पुढील वर्षभरासाठी देशामध्ये कोणत्या प्रकारे खर्च केला जाणार आहे किंवा विकासाची दिशा काय असेल याचा अंदाज अर्थसंकल्पा मधून येत असतो. त्यामुळे तो सार्वजनिक करण्यापूर्वी त्याची प्रचंड गुप्तता पाळली जाते. 

यासाठी विशेष खबरदारी म्हणून अर्थसंकल्प हा काही मोजक्या अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून तयार केला जातो. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या आणि छापणाऱ्या सर्व स्टाफ ची राहण्याची सोय अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये केली जाते. बजेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी कॉम्प्युटर्स सर्व networks पासून तोडली जातात. अर्थ खात्याच्या इमारतीच्या तळघरात असलेल्या छापखान्यात अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतरच या स्टाफला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com