निकालांच्या हंगामात नफ्याचा पाऊस, जाणून घ्या कोणत्या शेअर्स,सेक्टर्सचे नशीब चमकणार...

Share Market
Share MarketGoogle file photo

कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालाची सगळेचजण आतुरतेने वाट बघत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा अवघड आहे, पण या कठीण काळातही अनेक सेक्टर्समध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ज्या कंपन्यांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा आहे, त्यात निकालाआधी ॲक्शन वाढेल आणि पैसे मिळवण्याच्या संधीही वाढतील.

INDIA INC मध्ये मजबूत वाढीची शक्यता असल्याचे सीएनबीसी-आवाजच्या MOFSL चे हेमांग जानी आणि Hem Securities च्या आस्था जैन यांनी म्हटले आहे. पण तिमाही आधारावर विचार केला तर निकाल फ्लॅट असू शकतात. आर्थिक वर्ष 2022 मध्ये निफ्टीच्या EPS मध्ये घट होण्याची शक्यता जास्त आहे.

Share Market
अर्थसाह्यासाठी 'जे अँड के' बँकेसोबत 'टाटा मोटर्स'चे सहकार्य

तिमाही दर तिमाही आधारावर INFOSYS कडून तगड्या निकालांची आशा असल्याचे हेमांग जानी यांनी म्हटले. पण INFOSYS चेही मार्जिन फ्लॅट असू शकतात. तर Capco च्या अधिग्रहणामुळे Wipro ला फायदा होईल, तर HCL Tech च्या वाढीवर कोविडची टांगती तलवार आहे.

FMCG सेक्टरबाबतही हेमांग जानी यांनी आपली मतं व्यक्त केली. अनलॉकमुळे विक्रीमध्ये हळूहळू सुधार होण्याची चिन्हं आहेत. Q1 मध्ये मिळकतीमध्ये जावळपास 20 टक्के वाढीची शक्यता आहे. तर EBITDA मध्ये 22-23 टक्के वाढ होऊ शकते. हेल्थ, हायजिन प्रोडक्ट्सची मागणीही चांगली असेल, ग्रामीण भागातून चांगली मागणी येईल, ज्याचाही चांगला फायदा FMCG कंपन्यांना मिळेल असे हेमांग जानी यांनी म्हटले.

Share Market
दररोज 416 भरा अन् कोट्यधीश व्हा; जाणून घ्या योजनेबद्दल

फार्मा कंपन्यांकडून चांगल्या वाढीची अपेक्षा असल्याचे जानी म्हणाले. भारतीय फॉर्म्युलेशन व्यवसायात पुनरुज्जीवनाची आशा आहे कारण अमेरिकी बाजारात सध्या स्थिरता आहे, याचा नक्कीच फायदा होईल असे हेमांग जानी यांनी म्हटले.

खासगी बँकांमध्ये वार्षिक आधारावर PPoP (Pre-provision operating profit) 6 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष FY21 च्या पहिल्या तिमाहीत लो बेस वरून सपोर्ट मिळेल असे आस्था जैन यांनी म्हटले.

Share Market
दुसऱ्या लाटेतून सावरलो, लवकरच आर्थिक विकास मजबूत होईल!

मेटलच्या किंमती वाढल्याने मार्जिनला सपोर्ट मिळेल असे आस्था जैन यांनी म्हटले. कोरोनामुळे घरगुती मागणीवर इफेक्ट होऊ शकतो. तर दुसरीकडे एक्सपोर्टमुळे वॉल्यूमला सपोर्ट मिळेल तर जास्त मार्जिनमुळे घसरणीचा प्रभाव कमी होईल असे आस्था जैन यांनी म्हटले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com