esakal | दररोज 416 भरा अन् कोट्यधीश व्हा; जाणून घ्या योजनेबद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

Money

पैशांची बचत करण्यासाठी लोक सहसा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा Public Provident Fund (PPF) आधार घेतात. विशेषतः नोकरदार वर्ग या योजनेचा लाभ घेत असतात. सर्वसामान्य लोकांसाठी पीपीएफ योजना फायद्याची आहे

दररोज 416 भरा अन् कोट्यधीश व्हा; जाणून घ्या योजनेबद्दल

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पैशांची बचत करण्यासाठी लोक सहसा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा Public Provident Fund (PPF) आधार घेतात. विशेषतः नोकरदार वर्ग या योजनेचा लाभ घेत असतात. सर्वसामान्य लोकांसाठी पीपीएफ योजना फायद्याची आहे. सध्याच्या घडीला पीपीएफ द्वारे तुम्हाला वर्षाला 7.1 टक्क्यांचे व्याज मिळते. बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशापेक्षा पीपीएफ जास्त व्याज देते. पाच वर्षांची एफडी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि टाईम डिपॉझिट स्किमपेक्षा पीपीएफच्या माध्यमातून तुम्हाला जास्त व्याज मिळू शकते. (You can become a crorepati by saving Rs 416 daily know how)

तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करु पाहात असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पीपीएफची एक भन्नाट योजना आहे. तुमची संयम ठेवायची तयारी असेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक करु इच्छित असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. कोट्यधीश बनण्यासाठी पीपीएफ तुम्हाला संधी उपलब्ध करुन देत आहे. तुमची वार्षिक 1.5 लाख रुपये म्हणजे महिन्याला जवळपास 12 हजार 500 रुपये गुंतवण्याची तयारी असेल तर कोट्यधीश बनण्याच्या तुम्ही जवळ आहात.

हेही वाचा: अर्थसाह्यासाठी 'जे अँड के' बँकेसोबत 'टाटा मोटर्स'चे सहकार्य

सध्या केंद्र सरकार पीपीएफ खात्यावर 7.1 टक्क्यांचे व्याज देत आहेत. तुम्हाला 15 वर्षांपर्यत गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही महिन्याला 12,500 म्हणजे दिवसाला 416 रुपये पीपीएफ खात्यात भरले तर 15 वर्षांनंतर तुमच्या खात्यात 40,68,209 रुपये जमा होतील. यातील 22.5 लाख तुमची गुंतवणूक असेल आणि व्याज 18,18,209 असेल.

हेही वाचा: वर्षाभरात होईल बक्कळ कमाई, तज्ज्ञांनी सुचवलेत हे केमिकल कंपन्यांचे शेअर्स

तुम्ही या योजनेतून पैसे न काढता आणखी 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळू शकतात. पुढील 5 वर्षांत तुमची गुंतवणूक 66,58,288 होईल आणि पुढचे पाच वर्ष म्हणजे 25 वर्षांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत राहाल तर तुमच्या पीपीएफ खात्यात 1,03,08,015 रक्कम जमा होईल. पीपीएफची ही योजना दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आहे. तुमची 25 वर्षांपर्यंत संयम ठेवण्याची तयारी असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे.

loading image