EPF मध्ये नॉमिनीचं नाव बदलायचंय? जाणून घ्या डिटेल्स

अशा अनेक गोष्टी तुम्ही ऑनलाइन करू शकता.
EPF
EPFesakal
Summary

अशा अनेक गोष्टी तुम्ही ऑनलाइन करू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाइटवर लॉग इन करून EPF सदस्य त्यांचे नॉमिनी निवडू शकतात. हे काम तुम्ही ऑनलाइन करू शकता. तुम्ही हवे तितक्या वेळा नॉमिनीचे नाव बदलू शकता. EPFO ने देखील याबद्दल ट्विट केले आहे. सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ई-नॉमिनेशन भरावे. ही प्रक्रिया सोपी असून त्याची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे.

EPF
EPFO! आत्मनिर्भर भारत योजनेत नोंदणी करा, जबरदस्त फायदे मिळावा

ऑनलाइन जोडा नॉमिनीचे नाव


ऑनलाइन नॉमिनेशन भरण्यासाठी, सब्सक्रायबर्सना EPFO वेबसाइट epfindia.gov.in वर जावे लागेल. यानंतर, सर्व्हिस ऑप्शनवर जा आणि ड्रॉपडाऊनमध्ये 'एंप्लॉयीज' निवडा. त्यानंतर सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करा.

तुमच्या UAN आणि पासवर्डने त्यात लॉग इन करा. तुमची फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी 'येस'वर क्लिक करा. त्यानंतर ऍड फॅमिली डिटेल्सवर (Add Family Details) क्लिक करा. यात नॉमिनेशन डिटेल्सवर क्लिक करा.

EPF
EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल

त्यानंतर सेव्ह ईपीएफ नॉमिनेशनवर क्लिक करा. OTP जनरेट करण्यासाठी E-Sign वर क्लिक करा. ग्राहकाच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP सबमिट करा आणि तुमचे ई-नॉमिनेशन रजिस्टर्ड केले जाईल. यामध्ये एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडले जाऊ शकतात आणि यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com