कुटुंबासाठी कसा करावा नवा आर्थिक संकल्प?

बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वेळेचे भान पाळले पाहिजे.
Investment schemes for tax saving
Investment schemes for tax savingesakal

कोरोनाच्या छायेत २०२० हे वर्षं अर्थव्यवस्थेसाठी(economy) फार काही आशादायी नव्हते. गेल्या वर्षात जीडीपीमध्ये घसरण झाली होती. शेअर बाजार मात्र, सकारात्मक होता. कंपन्यांच्या शेअरने(company shares) विक्रमी परतावा दिला. त्यामुळे म्युच्युअल फंड(mutual fund), शेअर बाजारातून(share market) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. मात्र, पोस्टात किंवा बँकेत पैसे गुंतवतदारांची मात्र, बरीच निराशा झाली. कारण बॅंकेच्या कर्जाचे दर कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची परवड झाली. त्यांना तोटा सहन करावा लागला. (How to make a new financial planning for the family)

गुंतवणूक करताना

दृष्टिकोन महत्त्वाचा बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वेळेचे भान पाळले पाहिजे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा सुरक्षित पर्याय समजला जातो. परंतु म्युच्युअल फंडही शेअर बाजारावर अवलंबून असतो. नवे आर्थिक वर्ष २०२२-२३ ची सुरवात झालेली आहे. त्यात आर्थिक गुंतवणुकीचे संकल्प निश्चित करणे गरजेचे. शेअर बाजारात कधी उत्साह असतो, तर कधी निर्देशांक नीचांकावर जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवलेल्या पैशांची काळजी सतावत असते. शेअर बाजार घसरत असताना गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असते. शेअर लागलीच विकून न टाकता काही काळ वाट पाहावी. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशातील शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.

Investment schemes for tax saving
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा जाणून घ्या भाव

अनुभव हाच महागुरू

मागच्या अनुभवांतून शिकण्याची गरज म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मागचा अनुभव लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु काही वाईट अनुभवामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. फंड नियोजनात मागचा रेकॉर्ड आणि फंड व्यवस्थापकाचे व्यावहारिक कौशल्य, त्या कंपनीच्या कामगिरीचे अवलोकन करून निर्णय घेणे फायद्याचे असते. शेअर बाजारात पेशन्स असल्यास २ प्लस २ चे २२ होऊ शकते. घाईत परतावा हवा असल्यास २ प्लस २ चार होऊ शकते. कधी कधी दोन प्लस दोन शून्यही होऊ शकते.

Investment schemes for tax saving
सोन्यात किंचित घसरण! जाणून घ्या तुमच्या प्रमुख शहरातील भाव

निश्चित उत्पन्नात ठराविक गुंतवणूक

निश्चित उत्पन्नात गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे. गुंतवणुकीसाठी कमी जोखमीचे आणि सुरक्षित पर्याय निवडावे. वाढत्या महागाईने निश्चित उत्पन्नात केलेली गुंतवणुकीची जोखीम वाढू शकते. त्यामुळे अर्थतज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांत गुंतवणूक करा.

लहान मुलांच्या भविष्यासाठी

तुम्हाला मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असेल आणि त्यासाठी तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या मुलांसाठी विशेष योजना चालवतात. या योजनांनी आतापर्यंत चांगला परतावा देखील दिला आहे. मुलांसाठी या म्युच्युअल फंड योजनांचा योग्य वापर करता आला तर ते शिक्षण आटोपून नोकरीसाठी पात्र होण्यापूर्वीच कोट्यधीश झालेले असतील. विशेषतः यातील काही योजनांनी एका वर्षात ५० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

- प्रदीप जाजू, आर्थिक सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com