भारतातील काळी मिरीचा तिखटपणा कोण करतंय फिका

पूजा विचारे
Saturday, 5 December 2020

काळी मिरी नेमकी कुठून येते याचा आपण किंवा कोणीच अद्याप स्पष्टपणे विचार केला नाही. व्हिएतनाममध्ये काळी मिरीचं उत्पादन घेण्यासाठी प्रति किलोमागे १५० रुपयांपर्यंत खर्च येतो.

मुंबईः  भारतीय जेवणात काळी मिरीला बरंच महत्त्व आहे. काळी मिरीमुळे जेवणाला वेगळीच चव येते. मात्र बरेच लोक काळी मिरीबद्दल जास्त विचार करताना दिसत नाही. एवढंच काय तर काळी मिरी नेमकी कुठून येते याचा आपण किंवा कोणीच अद्याप स्पष्टपणे विचार केला नाही. मात्र आता दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या काळी मिरीबद्दल एक रंजक बाब समोर आली आहे. 

द हिंदू वृत्तपत्राच्या अहवालानुसार,  काळी मिरी या मसाल्याची किंमत २०१६- १७ मध्ये ६९४ रुपये प्रतिकिलो अशी होती. मात्र आता गेल्या दोन वर्षांपासून याच्या किंमती कमी झाल्या आहेत.  काळी मिरीची किंमत ३५०-४०० रुपये एवढ्या कमी झाल्यात. दरम्यान नोव्हेंबरमध्ये या किंमती ३२२ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या होत्या. 

सध्या काळी मिरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तसंच काळी मिरी आता सहज उपलब्ध देखील होत आहे आणि ही ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र काळी मिरीचं उत्पादन घेणारे उत्पादक या कमी झालेल्या किंमतीपासून फारसे खूश नाही आहेत. परदेशी आयातदारांकडून काळीमिरीची किंमत कमी केली जात असल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे.

व्हिएतनाम या देशाचा विचार केला असता, काळी मिरीच्या पुरवठ्यामध्ये व्हिएतनाम देशाचा पहिला क्रमांक लागतो. व्हिएतनामला इतर देशांना काळी मिरी स्वस्त किंमतीत पुरवठा करायला आवडतं.  व्हिएतनाममध्ये काळी मिरीचं उत्पादन घेण्यासाठी प्रति किलोमागे १५० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याच्या तुलनेत भारतातील केरळ या राज्यात त्याच दर्जाची काळी मिरी बनवण्यासाठी प्रति किलो मागे २०० ते २२५ रुपये असा खर्च येतो. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र अशी एक गोष्ट आहे की, भारतीय सरकारच्या नियमावालीनुसार बाहेरुन आलेल्या काळी मिरीवर आयत शुल्क आकारलं जातं. घरगुती उत्पादकांना संरक्षण मिळावं यासाठी भारतीय सरकारच्या काही नियमावली आहेत. त्यानुसार हे आयात शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे व्हिएतनामहून आलेली काळीमिरी जेव्हा भारतीय बाजारात समाविष्ठ होते, त्यावेळी त्याच्या किंमती आधीच ५० टक्क्यांपर्यंत वाढतात. या वाढलेल्या किंमतींचा फायदा भारतीय शेतकऱ्याला होतो. मात्र दुसरीकडे एक अशी अडचण आहे की, आयातदारांना आता या समीकरणांची पूर्णपणे कल्पना आली आहे. त्यामुळे आयातदार आता वेगळ्या रणनीतीचा वापर करु लागलेत.

महत्त्वाची बातमी-  धावपळ होऊ नये कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची ब्लू प्रिंट तयार
 

द हिंदूच्या अहवालानुसार, नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या देशात आयातदार व्हिएतनाममधील काळी मिरीचा सहज पुरवठा करतात. त्यानंतर या दोन्ही देशांच्या माध्यमातून भारतात काळी मिरीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या किंमती कमीच राहतात. या रणनीतीनुसार, भारत देश नेपाळ आणि श्रीलंका या देशांकडून आयातशुल्क आकारत नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या, व्हिएतनाममधील काळी मिरी भारतात आपला पुरवठा कायम ठेवू शकते ते सुद्धा कमी किंमतीत. 

How Vietnam is illegally transporting pepper to India via Nepal And Sri lanka


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Vietnam is illegally transporting pepper to India via Nepal And Sri lanka