esakal | जाणून घ्या 10 वर्षांपासून बँकेत पडून असलेली रक्कम कशी मिळवायची?
sakal

बोलून बातमी शोधा

Unclaimed Amount, Savings Account

अनक्लेमड रक्कम ही बचत खाते, चालू खाते, एफडी, आरडी यामध्ये जमा होऊ शकतो. हा सर्व पैसा आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँण्ड अवेअरनेस (डीईए) निधीमध्ये प्रत्येक महिन्याला ट्रान्सफर केला जातो.

जाणून घ्या 10 वर्षांपासून बँकेत पडून असलेली रक्कम कशी मिळवायची?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जर तुमचे एखाद्या बँक अकांउटवरुन 10 वर्षांपासून ट्रान्सक्शन केले नाहीत तर तुमची जमा रक्कम अडकून पडते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकाने 10 वर्ष खात्यावरुन कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही तर खात्यात जमा असलेली रक्कम अनक्लेमड होते. या पद्धतीने बँकेत जमा होणारी रक्कम वर्षानुवर्षे वाढत आहे. 2019 पर्यंतच्या अर्थिक वर्षात ही दावाविरहित रक्कम 18,380 कोटी इतकी होती. त्याच्या मागील वर्षी हा आकडा 14,307 कोटी इतका होता. 

अनक्लेमड रक्कम ही बचत खाते, चालू खाते, एफडी, आरडी यामध्ये जमा होऊ शकतो. हा सर्व पैसा आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँण्ड अवेअरनेस (डीईए) निधीमध्ये प्रत्येक महिन्याला ट्रान्सफर केला जातो. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये डीईए निधी जवळपास 9, 33,114 कोटी इतका होता. केंद्रीय बँकेच्या अहवालानुसार मागील वर्षी हा निधी 47 25,747 कोटी इतका होता. जाणून घेऊयात तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे बँक खात्यात अनक्लेम्ड असलेली रक्कम कशी काढता येईल.  

RBI द्वारे सहा नव्या पेमेंट वॉलेटची सुविधा; विना इंटरनेट आवाजाद्वारे करु शकाल व्यवहार


बँकेच्या वेबसाइटवरुन माहिती मिळवा 

आरबीआयच्या नियमानुसार, प्रत्येक बँकेला आपल्या वेबसाईटवर अनक्लेम्ड रक्कमेचा आढावा द्यावा लागतो. त्यामुळे ग्राहक संबंधित बँकेच्या वेबसाईटवरुन खात्याशी निगडित माहिती मिळवू शकतो. ही माहिती मिळवण्यासाठी जन्म तारीख, नाव आणि पॅन नंबर, नाव आणि पासपोर्ट क्रमांक, नाव आणि पिनकोड, नाव आणि मोबाईल क्रमांकच्या माध्यमातून तुम्ही खात्यासंदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता.  

क्लेम फॉर्म भरून मिळवू शकता रक्कम 

वेबसाईटवरुन माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या शाखेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. कागदपत्रांची पूर्तता करुन तुम्ही बँकेत जमा असलेल्या रक्कमेवर दावा करु शकता. तुम्ही जो दावा करत आहात तो डिजिटल बँक सेवा सुरु होण्यापूर्वीचा असेल तर ही प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ ठरेल. वारसा हक्क म्हणून बँकेतील रक्कमेवर दावा करताना तुम्हाला यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्ताता करावी लागेल. 

या गोष्टी ध्यानात ठेवा 

बँकेतील रक्कमेवर दावा करताना मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजनल डॉकक्युमेंट सोबत असणे आवश्यक आहे. बँक खाते निष्क्रीय झाल्यानंतरही जमा रक्कमेवर व्याज मिळत असते. जेव्हा बँक तुम्हाला अक्लेमड रक्कम देते त्यावेळी खाते पुन्हा सुरु होते. 

loading image