RBI द्वारे सहा नव्या पेमेंट वॉलेटची सुविधा; विना इंटरनेट आवाजाद्वारे करु शकाल व्यवहार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)ने पेमेंट सिस्टीमला अधिक दर्जेदार बनवण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)ने पेमेंट सिस्टीमला अधिक दर्जेदार बनवण्याची तयारी केली आहे. यासाठी आरबीआयने सहा फिनटेक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. आरबीआय या कंपन्यांच्या उत्पादनाला लाईव्ह टेस्टिंग करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. आरबीआयद्वारे ज्या सहा फिनटेक कंपन्यांना ही संधी दिली गेली आहे त्यामध्ये दोन कंपन्यांनी नोव्हेंबर, 2020 पासून टेस्टींग सुरु केली आहे. जयपूरमधील नॅचरल सपोर्ट कन्सल्टंसी सर्व्हिसेसने 'इ-रुपया' नावाने नव्या सिस्टीमचं परिक्षण सुरु केलं आहे. जे नियर-फिल्ड कम्यूनिकेशनवर आधारित प्रीपेड कार्ड आणि पॉइंट ऑफ सेलचा उपयोग करतं. कंपनीने यासाठी पंजाब नॅशनल बँकेशी करार केला आहे. या कंपनीचा फोकस छोट्या दुकानदारांना तसेच ग्रामीण भागात ऑफलाइन डिजीटल पेमेंटला चालना देण्याचा आहे. 

हेही वाचा - मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक

चार कंपन्यांनी डिसेंबरमध्ये सुरु केलं टेस्टींग
ज्या चार कंपन्यांनी डिसेंब महिन्यात आपल्या उत्पादनाची टेस्टींग सुरु केली आहे त्यामध्ये मुंबईमधील टॉप स्मार्ट डाटा इन्फोर्मेशन सर्व्हिसेस लिमिटेड ही एक आहे. ही कंपनी सिटीकॅश नावाने प्रीपेड कार्ड आणत आहे जे एनएफसी टेकनिकचा वापर करते. ग्राहक याचा वापर बस तिकीटाचे पैसे भरण्यापासून ते काही ठिकाणच्या व्यवहारांसाठी करु शकतात. फिनो पेटेक यासाठी गुंतवणूक करत आहे. 

बेंगलोरमधील एक कंपनी नफा इनोव्हेशन प्रा. लिमिटेड ध्वनी तंरगांचा उपयोग करुन सुरक्षित देवघेवीसाठी एक उत्पादन आणण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी टोनटॅग नावाने हे उत्पादन आणत असून ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पैसे भरण्यासाठी आवाजाच्या एन्क्रिप्ट तरंगाचा वापर करेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rbi will give six new types of payment wallets know the facilities