“हुडको’च्या शेअरची 73.55 रुपयांवर शानदार नोंदणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई:  केंद्र सरकारच्या मिनिरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात "हुडको'च्या शेअरची आज (शुक्रवार) शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. "हुडको'च्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 73.55 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.60 या इश्यू प्राइसपेक्षा 22 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.60 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते.

सध्या (10 वाजून .20 मिनिटे) राष्ट्रीय शेअर बाजारात हुडकोचा शेअर 77.20 रुपयांवर व्यवहार करत असून तो 4.20 रुपयांनी म्हणजेच 5.75 टक्क्यांनी वधारला आहे. शेअरने इंट्राडे व्यवहारात 77.85 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

चालू महिन्यात 8 ते 11 मे 2017 दरम्यान खुला असलेल्या "हुडको'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.  या इश्‍युसाठी रु.56 ते 60 किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे किरकोळ गुंतवणुकदारांना 2 रुपयांची सवलत (डिस्काउंट) देण्यात आली होती.

शेअर बाजार नियामक मंडळ सेबीने 'अॅस्बा'चा वापर अनिवार्य (कम्पल्सरी) करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच गुंतवणूकदारांकडून आयपीओसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहे. हुडकोच्या आयपीओसाठी 20 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.  "हुडको'च्या रु.1200 कोटींच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून दणदणीत प्रतिसाद मिळाला होता. रु.1210 कोटींच्या आयपीओसाठी तब्बल रु.97,000 कोटींच्या बोली लागल्या होत्या. सरकारी मालकी असलेल्या कंपनीच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर बोली लागली होती.

Web Title: 'Hudco" shares worth Rs 73.55