गाडी घेताय? मग एकदा चार्ज केल्यानंतर ही कार धावते 452 किमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

नवी दिल्ली: ह्युंदाई मोटर्स कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘ह्युंदाई कोना’ ही नवीन विजेवरील चालणारी एसयूव्ही सादर केली. ह्युंदाई कंपनीची भारतातील ही पहिलीच इलेक्‍ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 452 किलोमीटरचा प्रवास करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. 25 लाख रुपये इतकी किंमत या एसयूव्हीसाठी ठेवण्यात आली आहे. 

अतिशय उत्तम फिचर्स असलेली ही एसयूव्ही केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये उतरवण्यात आली आहे. ही एसयूव्ही 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोना इलेक्‍ट्रिकमध्ये 39.2 किलोव्हॅटची बॅटरी पॅक आहे. यासोबत देण्यात आलेली इलेक्‍ट्रिक मोटर 136 एचपीची ऊर्जा 395 एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यात आली आहे. अवघ्या 9.7 सेकंदांमध्ये ही कार 0 ते 100 कि.मी. प्रति तास इतका वेग घेते. डीसी फास्ट चार्जिंगमुळे ती अवघ्या 57 मिनिटांमध्ये चार्ज होते. कंपनी चार मोठ्या शहरांमध्ये इंडियन पेट्रोल पंपाजवळ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. 

 ‘ह्युंदाई कोना’ची वैशिष्ट्ये
-  पूर्ण चार्ज केल्यानंतर कार तब्बल 452 किलोमीटर धावते 
- एसयूव्ही 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध
- कोना इलेक्‍ट्रिकमध्ये 39.2 किलोव्हॅटची बॅटरी पॅक
- अवघ्या 9.7 सेकंदांमध्ये ही कार 0 ते 100 कि.मी. प्रति तास इतका वेग
- डीसी फास्ट चार्जिंगमुळे अवघ्या 57 मिनिटांमध्ये चार्ज

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyundai Kona Electric: All You Need To Know