सरकारमुळे 'किंगफिशर' बंद - मल्ल्या

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

केंद्राने सरकारी विमान वाहतुक कंपनी असणार्‍या 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा पैसा वापरला.

नवी दिल्ली - किंगफिशर एअरलाईन्स रसातळाला जाण्याचे खापर उद्योगपती विजय मल्ल्यांनी सरकारवर फोडत, सरकारची चुकीची विमान वाहतूक धोरणे किंगफिशर एअरलाइन्स बंद होण्यास जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

देशातून फरार घोषित करण्यात आलेले उद्योगपती मल्ल्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडविल्याचा मल्ल्या यांच्यावर आरोप आहे. मल्ल्या हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.

केंद्राने सरकारी विमान वाहतुक कंपनी असणार्‍या 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा पैसा वापरला. मात्र स्थानिक विमान कंपनी असणार्‍या किंगफिशर एअरलाइन्स बाबत दुजाभाव केला. आम्ही सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र कोणत्याही कर्जाची मागणी आमच्याकडून करण्यात आली नाही, असे मल्ल्यांनी म्हटले आहे.

Web Title: i begged for help not for loans says vijay mallya