esakal | ICICI Bank 5 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप साध्य करणारी दुसरी बँक
sakal

बोलून बातमी शोधा

ICICI-Bank

एचडीएफसी बँकेनंतर आयसीआयसीआय बँक 5 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप साध्य करणारी दुसरी बँक ठरली आहे, तर हा विक्रम साध्य करणारी ती देशातील सातवी कंपनी ठरली आहे.

ICICI Bank 5 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप साध्य करणारी दुसरी बँक

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपने बुधवारी 5 लाख कोटींचा टप्पा पार केला. या वर्षी आतापर्यंत आयसीआयसीआय बँकेचे स्टॉक 38 टक्क्यांनी वाढले आहेत. बुधवारी हा स्टॉक 734 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होता आणि त्याचे मार्केट कॅप 5.10 लाख कोटी रुपये होते.

एचडीएफसी बँकेनंतर आयसीआयसीआय बँक 5 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप साध्य करणारी दुसरी बँक ठरली आहे, तर हा विक्रम साध्य करणारी ती देशातील सातवी कंपनी ठरली आहे. याआधी रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि इन्फोसिसने मार्केट कॅपच्या बाबतीत ही पातळी गाठली आहे.

हेही वाचा: नुकताच लिस्ट झालेला केमिकल स्टॉक 19 टक्क्यांनी वधारणार

आयसीआयसीआय बँक ग्रोथ लीडर म्हणून उदयाला आल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे व्यवस्थापन खूप मजबूत आहे आणि त्याचा परतावा गुणोत्तरही खूप चांगला आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँक लवकरच एचडीएफसी बँक आणि स्वतःमधील मूल्यांकनातील अंतर (Valuation Gap) कमी करेल अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा: 'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

अलीकडेच आरबीआयने कंपनीचे एमडी आणि सीईओ संदीप बख्शी यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवसायात चांगली वाढ होईल असे एडलवाईसने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेचे खरेदी रेटिंग (Buy Rating) आमच्या टॉप पिक्समध्ये (Top Pics) समाविष्ट केले असल्याचेही एडलवाईसने म्हटले आहे.

बुधवारी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 0.85 अर्थात 0.12 टक्के वाढीसह 719.90 रुपयांवर बंद झाला. बीएसई वर हा स्टॉक 0.55 अर्थात 0.08 टक्क्यांनी घसरून 118.30 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा: साखरेच्या 8 शेअर्सची 'विक्रमी' उडी

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top