esakal | लंबी रेस का घोडा! नुकताच लिस्ट झालेला केमिकल स्टॉक 19 टक्क्यांनी वधारणार
sakal

बोलून बातमी शोधा

Share

येत्या काळात, हा स्टॉक 500 रुपयांचा आकडा ओलांडण्याचा अंदाज आहे.

नुकताच लिस्ट झालेला केमिकल स्टॉक 19 टक्क्यांनी वधारणार

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

लक्ष्मी ऑरगॅनिकने (Laxmi Organic) आतापर्यंत आपल्या 130 रुपयांच्या इश्यू प्राईसपेक्षा 223 टक्क्यापेक्षा जास्त मजल मारली आहे. दुसरीकडे इतक्या तेजीनंतरही, हा शेअर लांबचा पल्ला गाठेल असा विश्वास विश्लेषकांना आहे. लक्ष्मी ऑरगॅनिकचे शेअर्स कोसळल्यानंतर खरेदी करणे योग्य ठरेल असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. येत्या काळात, हा स्टॉक 500 रुपयांचा आकडा ओलांडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: 'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

स्पेशालिटी कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजने 2021 च्या आयपीओमध्ये (IPO) भन्नाट प्रदर्शन केले आहे. लिस्टिंगनंतर केवळ 5 महिन्यांत या शेअर्सने 130 रुपयांवरुन 223 टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे. बीएसई 500 (BSE500) च्या स्टॉक्सशी तुलना केल्यास असे लक्षात येईल, लक्ष्मी ऑरगॅनिकच्या शेअर्सने गेल्या 5 महिन्यांत सर्वात जास्त नफा कमावला आहे. कंपनीची मजबूत ऑर्डर बूक आणि पहिल्या तिमाहीचे मजबूत निकाल या दोघांचाही स्टॉकवर चांगला परिणाम दिसत आहे.

हेही वाचा: कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदर कपात; बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदर घटवले

याच 5 महिन्यांच्या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 19 टक्के, बीएसई मिडकॅपमध्ये (BSE Midcap) 18 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात (Smallcap index ) 31 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. अॅसिटायल इंटरमिजिएट (acetyl intermediates) आणि स्पेशालिटी इंटरमिजिएट्स (specialty intermediates) मार्केटमध्ये 30 टक्के वाटा असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिकने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत (Q1FY22) 102.3 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, जो 2021 च्या संपूर्ण आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यापेक्षा केवळ 25 कोटी रुपये कमी होता.

हेही वाचा: ॲक्सिस बॅंक, एसबीआय, एचडीएफसी आणि कोटक बॅंकेची रिलायन्सच्या एनसीडीत १०,००० कोटींची गुंतवणूक

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत (Q1FY22) मध्ये कंपनीच्या एकत्रित नफ्यात वार्षिक आधारावर 379 टक्के आणि तिमाही आधारावर 181 टक्क्यांनी वाढ झाली होती. याच काळात कंपनीचा महसूल 736.4 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर 42 टक्के आणि वार्षिक आधारावर 82 टक्के वाढ बघायला मिळाली.

हेही वाचा: कोटक बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

लक्ष्मी ऑरगॅनिकच्या स्टॉक्समध्ये इतकी तेजी असूनही हा स्टॉक आणखी चांगली कामगिरी करु शकतो आणि हा शेअर घसरणीवर खरेदी करणे योग्य ठरेल असे इक्विटी 99 (Equity99) च्या राहुल शर्मा यांनी सांगितले. येत्या काळात हा साठा 500 रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता असल्याचेही राहुल शर्मा म्हणाले. वर्तमान परिस्थितीत हा शेअर घेण्याचा सल्ला नाही देऊ शकत पण दीर्घकालीन चांगल्या परताव्यासाठी हा शेअर जेव्हा कोसळेल तेव्हा खरेदी करण्याचा सल्ला राहुल शर्मा यांनी दिला आहे.

हेही वाचा: ‘महिंद्रा’ची नवीन 7 सीटर ‘बोलेरो निओ’ लाँच, जाणून घ्या सर्वकाही

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top