‘एफटीएसई’मध्ये समावेशानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल तेजीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई: एफटीएसई रसेल निर्देशांकात समावेशानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, युपीएल, हिंडाल्को इंडस्ट्रीज्, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि पिरामल एन्टरप्रायझेसच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

या कंपन्यांना एफटीएसई रसेलच्या लार्ज कॅप निर्देशांकात समाविष्ट करण्यात आला आहे. हा बदल 20 मार्चपासून लागू होणार आहे. त्याऐवजी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर आणि डिव्हीस लॅबोरेटरीज या कंपन्या बाहेर पडणार आहेत.

संबंधित घोषणेनंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफच्या शेअरने 370 रुपयांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 365 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 363.90 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 371.50 रुपयांवर दिवसभराची तसेच 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(1 वाजून 12 मिनिटे) 367.60 रुपयांवर व्यवहार करत असून 1.70 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: ICICI Pru Life, Hindalco jump on FTSE large cap inclusion