IDBI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेचे नवीन बदल १ जुलैपासून लागू

यापुर्वी ग्राहकांना IDBI बँकेत खाते उघडल्यानंतर पहिल्या वर्षात बँकेकडून 60 पानांचे चेकबुक निशुल्क मिळत होते
bank
bankbank

औरंगाबाद: आता IDBI बँकेच्या ग्राहकांना वर्षात मिळणाऱ्या चेकमध्ये मोठा बदल झाला आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षाला ग्राहकांना 20 पाणी चेकबुक मिळणार आहे. त्यापेक्षा जर जास्त चेक लागत असतील तर प्रति जास्तीच्या चेकला 5 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हा बदल पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.

यापुर्वी ग्राहकांना IDBI बँकेत खाते उघडल्यानंतर पहिल्या वर्षात बँकेकडून 60 पानांचे चेकबुक निशुल्क मिळत होते. पुढील वर्षात बँक ग्राहकांना 50 पानी चेकबुक देत होते. त्यानंतर जास्तीच्या प्रतिचेकला 5 रुपये शुल्क आकारले जात होते.

bank
PHOTO: मराठवाड्यातील 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे

IDBI बँकेने एका नोटिसमध्ये सांगितले आहे की, हा नवीन बदल आणि जास्तीची चेक फी आकारणी जुलै 2021 पासून लागू होईल. पण हा बदल ज्या ग्राहकांचे सेव्हिंग अकाउंट आहेत त्यांना लागू नसणार आहे. त्यांना एका वर्षात अमर्याद चेक विनाशुल्क मिळणार आहेत.

रोख रक्कम (होम आणि नॉन होमसाठी) जमा करण्यासाठी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता दरमहा मोफत सुविधांची संख्या कमी करून विविध बचत खात्यांसाठी अनुक्रमे 7 आणि १० मधील प्रत्येकी पाच करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com