आयडीबीआयकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

मुंबई: आयडीबीआय बँकेने दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) आणि अल्पकालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 25 ते 50 बीपीएसची कपात करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांच्या आणि एक ते दोन वर्ष आणि दोन-तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे ती आता अनुक्रमे 15 बीपीएसने कमी करत 7.05 टक्के आणि 6.9 टक्के करण्यात आली आहे. 

बँकेच्या सात दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी 3.5 टक्के ते 7.10 टक्क्यांदरम्यान व्याज दिले जाते. याआधीच्या महिन्यात, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 10-25 बीपीएसची कपात केली आहे. एसबीआयने दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी 5-15 बेसिस पॉईंट्स कपात केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IDBI Bank cuts interest rates on FD by 15 bps