हेल्मेट न वापरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

यापुर्वी राज्यात वाहतूकीचे नियम कडक केले असतानाही त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसले होते.

भूवनेश्वर:  जे लोक दुचाकी गाडी चालवताना हेल्मेट वापरत नाहीत त्यांच्यावर धाक बसण्यासाठी ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार राज्य सरकारने राज्य पोलिसांना आणि वाहतूक विभागाला हेल्मेट न घालणाऱ्यांचे ड्राइविंग लाइसेंस सस्पेंड करण्याचे निर्देश दिले आहेत. 

यापुर्वी राज्यात वाहतूकीचे नियम कडक केले असतानाही त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसले होते. आता नियम न पाळणाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. राज्यातील वाढणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

परिवहन विभागाचे सचिव  एम. एस पाढ़ी डीजीपी आणि ट्रान्सपोर्ट कमिशनरला पत्र लिहून हे कारवाईचे आदेश दिले आहेत. यामध्ये ज्या चालकांनी गाडी चालवताना हेल्मेट घातलं नाही त्यांचं ड्राइविंग लाइसेंस निलंबित करण्याचे सांगितले आहे. तसेच इतर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्यांना 2019 मध्ये हेल्मेट कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल जिल्हानिहाय माहिती मागवली होती. तसेच 2020च्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईचे अवहाल सात दिवसांच्या आत सादर करण्यास सांगितले होते.

Honda ने जुन्या दुचाकींचे रेपसॉल एडिशन्स केले लाँच

2019 मध्ये ओडिशातील एकूण 11 हजार 64 रस्ते अपघातांपैकी 4688 रस्ते अपघातांमध्ये दुचाकी वाहनांचा समावेश होता. तर 2019 मध्ये राज्यात एकूण 5333 अपघात झाले, त्यापैकी 2398 अपघात दुचाकी वाहनांवर होते. पत्रात म्हटले होते की, अपघाताच्या वेळी 2398 पैकी 2156 चालकांनी हेल्मेट घातले नव्हते. पाढी यांनी आपल्या पत्रात असेही नमूद केले आहे की, हेल्मेट घातल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले असते.

काही काळांपुर्वी देशभरात मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे ज्यानंतर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना आता पूर्वीपेक्षा जास्त चलान भरावे लागतील. वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चलानची रक्कम 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if helmet not wear driving License will suspend