esakal | Honda ने जुन्या दुचाकींचे रेपसॉल एडिशन्स केले लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

hornet and dio

होंडा मोटरसायकल ऍंड स्कूटर इंडियाने (HMSI) डिओ आणि हॉर्नेट 2.0 ची रेपसॉल होंडा एडिशन्स (Repsol Honda Editions) लाँच केलं आहे

Honda ने जुन्या दुचाकींचे रेपसॉल एडिशन्स केले लाँच

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: होंडा मोटरसायकल ऍंड स्कूटर इंडियाने (HMSI) डिओ आणि हॉर्नेट 2.0 ची रेपसॉल होंडा एडिशन्स (Repsol Honda Editions) लाँच केलं आहे. दोन्हीही मॉडेलच्या Repsol Honda MotoGP रेसिंग टीम वर आधारित नवीन ग्राफिक्स आणि कलर मिळाले आहेत. या नव्या इडिशन होंडाच्या 800 व्या ग्रॅंड प्रिक्सच्या विजयाचे सेलिब्रेशन आहे. होंडाला ऑक्टोबरमध्ये 800 वा विजय मिळाला होता. 

किंमत किती असणार-
होंडा मोटारसायकल ऍंड स्कूटर इंडियाच्या मते, Repsol एडिशन मॉडेलच्या या दोन गाड्या पुढील आठवड्यापासून सर्व होंडाच्या शोरूममध्ये विक्रीस असतील. नवीन रंगांव्यतिरिक्त डिओ रेपसोल स्कूटर आणि हॉर्नेट 2.0 रिपसोल मोटारसायकलचे इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि फिचर पहिल्या सारखीच आहेत. Dio रेपसॉल होंडा एडिशनची किंमत 69 हजार 757 रुपये आहे. तर Hornet 2.0 रेपसॉल होंडा एडिशनची किंमत 1 लाख 28 हजार रुपये आहे. ही गुरुग्राममधील एक्स-शोरूमची किंमत आहे.

#petrolPrice: पेट्रोलच्या दरात 50 दिवसानंतर वाढ; डिझेलही महागले

आकर्षक रंगांचे पर्याय-
डिओ आणि हॉर्नेट 2.0 च्या रिपसोल इ़डिशन्स आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. होंडा डिओमध्ये 110 सीसीची सिंगल सिलिंडर मोटर आहे जी  7.68bhp पावर आणि  8.79Nm पीक टॉर्क जनरेट करते. 

ज्यात इंधनाचे इंजेक्शन देण्यात आले आहे, जे 7.68 bhp आणि 8.79NM पीक टॉर्क ची निर्मिती करते. डिओला टेलिस्कोपिक सस्पेन्शन, इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड ड्युअल फंक्शन स्विच, एक्सटर्नल फ्यूल लिड, पासिंग स्विच आणि इंजिन कट-ऑफ सह साईड स्टँड इंडिकेटर देण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Hornet 2.0 बाइकमध्ये 184.4ccचं इंजिन दिलं असून ते 17bhp पावर आणि 16.1Nm पीक टॉर्कची निर्मिती करते. तसेच या बाइकला 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाइकला सिंगल चॅनल एबीएससह ड्युअल पेटल ब्रेक देण्यात आले आहेत.

(edited by- pramod sarawale)

loading image