इफ्फको ग्रामीण आरोग्यसेवा क्षेत्रात

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

सहकारी खत उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या `इफ्फको`ने ग्रामीण हेल्थ केअर (जीएचसी) या स्टार्ट अप कंपनीतील २६ टक्के समभाग विकत घेतले आहेत.

सहकारी खत उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या `इफ्फको`ने ग्रामीण हेल्थ केअर (जीएचसी) या स्टार्ट अप कंपनीतील २६ टक्के समभाग विकत घेतले आहेत.

जीएचसी ही गुरगाव येथील कंपनी असून, हेल्थकेअर क्लिनिक्सच्या माध्यमातून वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि आधुनिक निदान सेवा पुरविण्याचे काम करत आहे. `इफ्फको`चे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी म्हणाले, ``ही नवीन किफायतशीर आणि सहजगत्या उपलब्ध आरोग्यसेवा शेतकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांसाठी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठीची ती पहिली पायरी ठरेल.`` तसेच `इफ्फको`ने १२५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे भरविण्याचे नियोजन केले आहे, असे अवस्थी यांनी सांगितले.

Web Title: IFFCO buys 26% stake in Gramin Health Care