
'या' शेअरने एका वर्षात दिला 1000% परतावा, तुमच्याकडे आहे का ?
राधिका ज्वेलटेकचे (Radhika Jeweltech) शेअर्स 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहेत. राधिका ज्वेलटेकच्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 17 रुपयांवरून 196.85 वर पोहोचली आहे. या काळात ती 1,000 टक्क्यांहून अधिक वाढली. पण, आयआयएफएल सिक्युरिटीजला या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आणखी तेजी येईल असा विश्वास वाटत आहे. या शेअरने 180 रुपयांवर नवीन ब्रेकआउट दिला आहे. येत्या काळात हा शेअर 230 रुपयांवर जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राधिका ज्वेलटेकचे (Radhika Jeweltech) शेअर्स चांगल्या व्हॉल्यूमसह शेअर बाजारात व्यापार करत आहे असे ब्रोकरेजच्या अहवालात म्हटले आहे
हेही वाचा: 'हे' 2 स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का? वाचा तज्ञांचे मत
हा मल्टीबॅगर स्टॉक बुलिश चार्ट फॉर्मेशनला फॉलो करत असल्याचे आयआयएफएल (IIFL) सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितले. यामध्ये 'हायर टॉप हायर बॉटम' फॉर्मेशन तयार होत आहे जे त्यात पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवते. हा तेजीच्या कॅंडलस्टिक पॅटर्नला फॉलो करत आहे ज्यामुळे स्टॉकमध्ये आणखी तेजी येऊ शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.
IIFL सिक्युरिटीजने या मल्टीबॅगर स्टॉकवर तेजीचा अहवाल दिला आहे. राधिका ज्वेलटेकच्या शेअरच्या किमतीत 180 रुपयांच्या मजबूत ब्रेकआउटनंतर सुमारे 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा: IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट
मिंटमधील बातम्यांनुसार, राधिका ज्वेलटेक शेअरच्या पोझिशनसाठी, IIFL सिक्युरिटीजने 185 ते 190 रुपयांवर कोणत्याही घसरणीवर हा स्टॉक खरेदी करावा असे म्हटले आहे. यामध्ये 220 ते 230 रुपयांचे टारगेट दिसेल, तसेच 167 रुपयांच्या पातळीवर स्टॉप लॉस ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला. यामध्ये 1 ते 2 महिन्यांतच टार्गेट दिसू शकते असा विश्वास त्यांना आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Iifl Securities Has Reported Multibagger Stocks Fast Gaining
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..