esakal | अस्थिरतेत या मौल्यवान धातूचे महत्त्व वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

सोन्याचे महत्त्व का वाढले?

 • शेअर बाजार अलीकडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेअरमधील गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात घटले. 
 • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मूल्यही घसरले.
 • मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदर सहा टक्‍क्‍यांच्या आसपास
 • रिअल इस्टेटमधील मंदीत ‘कोविड’च्या संकटाने भर
 • गुंतवणूकयोग्य पैसा सुरक्षित साधनांत जावा, अशी इच्छा प्रबळ
 • आणीबाणीच्या क्षणी त्वरित पैसे उभे करण्याची क्षमता.

अस्थिरतेत या मौल्यवान धातूचे महत्त्व वाढले

sakal_logo
By
मुकुंद लेले

एकीकडे कोविड-१९ मुळे ठप्प झालेले उद्योग-व्यवसाय आणि दुसरीकडे शेअर बाजारातील घसरण, म्युच्युअल फंडाचे कमी झालेले मूल्य, मुदत ठेवींचे अत्यल्प व्याजदर, रिअल इस्टेटमधील मंदी या पार्श्‍वभूमीवर विश्‍वासाचा आणि भरवशाचा हुकमी एक्का म्हणून सोने सध्या भाव खात आहे. जागतिक अस्थिरतेत या मौल्यवान धातूचे महत्त्व वाढते, याचा अनुभव आता सर्वांना येत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण कायम राहिल्याचे चित्र दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सोन्याचे महत्त्व का वाढले?

 • शेअर बाजार अलीकडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेअरमधील गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात घटले. 
 • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मूल्यही घसरले.
 • मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदर सहा टक्‍क्‍यांच्या आसपास
 • रिअल इस्टेटमधील मंदीत ‘कोविड’च्या संकटाने भर
 • गुंतवणूकयोग्य पैसा सुरक्षित साधनांत जावा, अशी इच्छा प्रबळ
 • आणीबाणीच्या क्षणी त्वरित पैसे उभे करण्याची क्षमता.

डिजिटल वा पेपरगोल्डला पसंती

 • सराफी दुकाने बंद असल्याच्या काळात गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड, गोल्ड बाँड, गोल्ड बीज यासारख्या डिजिटल किंवा पेपरगोल्डच्या खरेदीला पसंती
 • या वर्षी ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’चा पर्याय गुंतवणूकदारांना पुन्हा उपलब्ध.
 • संधी मिळताच नागरिकांची सोन्यावर उडी.

सोन्याला बळ कशामुळे?

 • कोविड-१९ च्या वाढत्या संकटाबरोबरच अमेरिका-चीनमधील ताणले गेलेले संबंध, अमेरिकेतील बेरोजगारीचा वाढलेला दर, युरोपमधील औद्योगिक उत्पादनाची निराशाजनक आकडेवारी 
 • भारतात मल्टी कमॉडिटी एक्‍स्चेंजवर (एमसीएक्‍स) जून गोल्ड फ्युचर्स विक्रमी पातळीवर
 • भाव १.६ टक्‍क्‍यांनी वाढून प्रति १० दहा ग्रॅमला ४७,४६२ रुपयांच्या नव्या उच्चांकावर
 • ‘स्पॉट गोल्ड’चा भाव सध्या १० ग्रॅमला ४७ हजार रुपयांच्या पुढे.
 • भारतातील सोन्याच्या भावात १२.५ टक्के आयातशुल्क आणि ३ टक्के ‘जीएसटी’चा समावेश
 • भारतात सोन्याच्या भाव गेल्या वर्षभरात सुमारे ५० टक्के वाढ 
 • आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस १७५० डॉलरचा टप्पा ओलांडला.

आगामी काळात काय होईल?

 • जगातील अस्थिरता लक्षात घेता, सोन्याचा भाव वर्षाखेरीपर्यंत १० ग्रॅमला ४८ हजार ते ५२ हजार रुपयांच्या पातळीत राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
 • हे भाव एका पातळीत फार काळ टिकणार नाहीत. त्यामुळे खरेदी-विक्रीचा निर्णय वेळेवर घ्यावा लागणार. 

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोदी सरकार रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणार

जगभरातील मध्यवर्ती बॅंकांनी प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर करायला सुरवात केली आहे. दुसरीकडे व्याजदर कमी ठेवले जात आहेत. त्यामुळे सोन्याचा भावाला आधार मिळत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठा काळ लागणार आहे. त्यामुळे सोन्याला मागणी येताना दिसत आहे.
- प्रथमेश मल्ल्या, मुख्य विश्‍लेषक, एंजल ब्रोकिंग लि.

लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर नागरिक सोने विकायला येणार नाहीत, उलट खरेदीच करायला येतील, असे मी आधीपासून म्हणत होतो. सोन्याचा भाव कमी झाला म्हणून किंवा वाढला तर आणखी वाढेल म्हणून नागरिक सोने घेतच असतात. त्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी होणार नाही. कोविडमुळे लग्नसराईसारखे कार्यक्रम मर्यादित खर्चात होतील.
- अमित मोडक, प्रसिद्ध कमोडिटीतज्ज्ञ 

प्रत्यक्ष सोने सांभाळण्यापेक्षा ते बाँड किंवा डिजिटल स्वरूपात ठेवल्यास सांभाळण्याची जोखीमही राहात नाही, शिवाय सोन्यात वाढदेखील होऊ शकते. सॉव्हरिन गोल्ड बाँड घेतल्यास त्यावर वार्षिक परतावा मिळू शकतो. शिवाय भविष्यात सोन्याची भाववाढ झाल्यास त्याचाही लाभ मिळू शकतो.
- महेंद्र लुणिया, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, विघ्नहर्ता गोल्ड

जगभरातील अर्थव्यवस्थेत जेव्हा अनिश्‍चितता असते, तेव्हा गुंतवणूकदार एका विश्वासार्ह माध्यमात गुंतवणूक करतात आणि ते म्हणजे सोने. म्हणूनच त्याच्या भावात इतक्‍या लवकर वाढ झाली आहे. दीर्घकाळाचा विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सोने हे भविष्यात सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूकमाध्यम राहील, असे वाटते.
- सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स