आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोदी सरकार रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणार

टीम ई-सकाळ
Saturday, 16 May 2020

आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या वर्गातील लोकांना दिलासा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Nirmala Sitharaman Announcement  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड 19 संदर्भातील 20 लाख कोटी पॅकेजसंदर्भात चौथ्यांदा पत्रकार परिषदेला संबोधित केले. यापूर्वीच्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी कृषीविषयक घटकावर भर दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक वाढीसह रोजगार निर्मितीवर भर दिल्याचे पाहायला मिळाले. शेतीविषयक 11 घोषणा केल्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुंतवणूक आणि रोजगार वाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतरही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दुसरीकेड लॉकडाउनमुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. 

जागतिक बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलरची मदत

जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करताना मोदी सरकारसमोर खूप मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्यांदा देशवासियांना संबोधित करताना अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आपतकालीन पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजमधून कोणत्या घटकांना कशी मदत केली जाणार याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाअंतर्गत केलेल्या पॅकेजची रक्कम ही देशाच्या जीडीपीच्या जवळपास 10 टक्के इतकी आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या काळात केलेल्या 1.70 लाख कोटी रुपयाच्या मदत निधीचाही समावेश आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala sitharaman live announcement of atmanirbhar bharat package Rs 20 lakh cr Covid packages part 4