Crypto Currency | 2 तासात एक हजाराचे बनले 60 लाख, क्रिप्टोकरन्सीत बक्कळ नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिप्टो

गुंतवणूकदरांना मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त होत असल्याने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे.

2 तासात एक हजाराचे बनले 60 लाख, क्रिप्टोकरन्सीत बक्कळ नफा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टो करंन्सीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण यामध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहेत. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदरांना मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त होत असल्याने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारी Shih Tzu नावाच्या क्रिप्टो करंन्सीमध्ये केवळ दोन तासात 6,00,000 टक्क्यांची वाढ झाल्याचे वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिले आहे.

केवळ दोन तासात 59.33 लाखांचा फायदा

कॉइन मार्केट कॅपच्या माहितीनुसार, केवळ दोन तासात Shih Tzu मध्ये 6 लाख टक्क्यांची वाढ झाली. अगदी कमी कालावधीत डिजिटल टोकन Shih Tzu ने 0.000000009105 डॉलरवरून 0.00005477 डॉलरवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे या डिजिटल टोकनमध्ये 1,000 रुपयांची गुंतवणूक केवळ दोन तासांमध्ये 60 लाख रुपयांमध्ये परिवर्तित झाली. याचाच अर्थ असा झाला की, यामध्ये गुंवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 59.99 लाख रुपयांचा फायदा झाला. एक्सेंजमध्ये या डिजिटल टोकनच्या व्हॉल्यूममध्ये 65 टक्के वाढ झाली.

हेही वाचा: भारतात क्रिप्टो करन्सीसाठी दरवाजे बंद होणार नाहीत, समजून घ्या सर्वकाही...

एका आठवड्यात बिटकॉइनच्या किमतीत 12 टक्क्यांहून अधिक घसरण

गेल्या काही दिवसांमध्ये कोकोस्वॅप (Kokoswap), इथेरियम मेटा (Ethereum Meta) आणि ARC Governance या सारख्या क्रिप्टोकरेंसीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बघण्यात आले होते, मात्र ही वाढ थोड्या कालावधीसाठीच होती. Shih Tzu हे एक क्रॉस-चेन बेस्ड मीम टोकन आहे. क्रिप्टो मार्केटवर लक्ष ठेवणाऱ्या अभ्यासकांच्या मते, क्रिप्टो मार्केटमध्ये Shih Tzu च्या सर्कुलेटिंग सप्लायबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाहीये. क्वॉइनमार्केटकॅपच्या माहितीनुसार सोमवारी बिटक्वॉइनच्या एका यूनिटची किंमत 57,403.26 डॉलर इतकी होती. गेल्या 7 दिवसांमध्ये बिटक्वॉइनच्या किंमतींमध्ये 12.88 टक्के इतकी घसरण झाली आहे.

जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत असलेली क्रिप्टोकरन्सी भारतात टिकणार का, यावर संसदेत चर्चा सुरू होती. संसदेच्या स्थायी समितीची यासंदर्भात बैठक पार पडली. क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत सध्या सुरू असलेल्या आर्थिक बाबींवर संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत डिजिटल चलनात गुंतवणुकीवर बंदी घालता येणार नाही यावर एकमत झालं आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आहेत. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर सध्या बंदी घातली जाणार नाही! ते नियमनाच्या कक्षेत आणण्यावर एकमत झाल्याची माहिती या बैठकीनंतर समोर आली आहे.

loading image
go to top