Tata Job : आधीच मंदी, त्यात कोरोनाचे सावट! तरी, Tata Group करणार हजारो पदांची बंपर भरती

कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत.
Tata Job
Tata Job sakal

जागतिक पातळीवर मंदी आल्यामुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देत आहे.

टाटा समूहाची अभियांत्रिकी आणि बांधकाम (EPC) क्षेत्रात या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून नोकर भरती करणार आहे.

टाटा प्रोजेक्ट्सचे मुख्य अधिकारी गणेश चंदन यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, टाटा प्रोजेक्ट्स 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांची नियुक्ती करणार आहे. या नियुक्त्यांमध्ये, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs) मधील 255 पदवीधर असतील.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून नियुक्ती मिळेल. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती केली होती, ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी मिळाली होती.

गणेश चंदन यांच्या मते, टाटा प्रोजेक्ट कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नोकर भरती करत आहे. गेल्या पाच वर्षांत, कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान पदवीधरांना 5,700 कायमस्वरूपी कर्मचारी वर्गात जोडले आहे.

ते म्हणाले की, आम्हाला देशांतर्गत प्रतिभा वाढवायची आहे. कॅम्पसमध्ये भरती करणारे बहुतेक अभियंते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांमधील आहेत.

दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांची नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी, सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता. हे प्रमाण आता 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

Tata Job
Amazon : भारतासाठी आमची प्रतिबद्धता पूर्वीपेक्षा जास्त आहे - मनीष तिवारी

येत्या दोन वर्षांत 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षांमध्ये 50 टक्के महिलांना नोकरी देण्याचा कंपनीचा मानस आहे.

टाटा प्रोजेक्ट्स NIT केंद्रांवरून वारंगल, कालिकत, सुरतकल, सिलचर आणि सुरतमधून कामावर घेतात. तर, पदवीधर हे बॉम्बे, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी आणि BHU मधील आहेत. कंपनी नोकरीसाठी कॅम्पस भेटी देत ​​आहे.

टाटा समूह तमिळनाडूतील होसूर प्लांटमध्ये अॅपल आयफोन उत्पादनासाठी 45,000 कामगारांची नियुक्ती करणार आहे. तर, गेल्या सप्टेंबरमध्ये पाच हजार कामगारांना कामावर घेण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com