'प्राप्ती जाहीर योजने'ला मोठे यश 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: केंद्र सरकारची काळा पैसा जाहीर करण्यासाठीची "प्राप्ती जाहीर योजना' मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून, यातून सरकारला 29 हजार 362 कोटी रुपयांचा कर मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी दिली. 

जेटली म्हणाले,"सरकारने 1997 मध्ये आणलेल्या योजनेच्या तिप्पट पैसा "प्राप्ती जाहीर योजने'तून मिळाला आहे. या योजनेत 64 हजार 275 नागरिकांनी 65 हजार 250 कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला आहे. यातून सरकारला 29 हजार 362 कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. याआधी सरकारने 1997 मध्ये ऐच्छिक काळा पैसा जाहीर करण्यासाठी आणलेल्या योजनेत 4.72 लाख नागरिकांनी 33 हजार 697 कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर केला होता. यातून सरकारला 9 हजार 729 कोटी रुपयांचा कर मिळाला होता. 

प्राप्ती जाहीर योजना (2016) 
नागरिकांची संख्या : 64 हजार 275 
काळा पैसा : 65 हजार 250 कोटी रुपये 
कर : 29 हजार 362 कोटी रुपये 
ऐच्छिक प्राप्ती जाहीर योजना (1997) 
नागरिकांची संख्या : 4.72 लाख 
काळा पैसा : 33 हजार 697 कोटी रुपये 
कर : 9 हजार 729 कोटी रुपये 
 
Web Title: Income Declaration Scheme a success, says Arun Jaitley