करदात्यांसाठी खूशखबर! ITR भरण्याची मुदत वाढली

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ
tax
taxtax

नवी दिल्ली: कोरोना महासाथीचे वाढते संकट लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Filing Deadline) दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या कर अनुपालनासाठीदेखील (tax compliance) मुदतवाढ देण्यात आल्याचे ‘सीबीडीटी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचे विवरणपत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. ऑडिटची गरज नसलेल्या वैयक्तिक करदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी दरवर्षी ३१ जुलैपर्यंतची मुदत असते. यंदा ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ऑडिटची गरज असलेल्या कंपन्या वा संस्थांसाठी असे विवरणपत्र दाखल करण्याची मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. अशा कंपन्या वा संस्थांना एरवी ३१ ऑक्टोबरपर्यंत असणारी मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत असेल.

tax
एलॉन मस्क यांच्या एका ट्विटने बिटकॉईन क्रॅश; किंमत घसरली

तसेच, दरवर्षी कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या फॉर्म १६ साठीची (वार्षिक उत्पन्नाचा दाखला) मुदत देखील एक महिन्याने वाढवून आता १५ जूनऐवजी १५ जुलै २०२१ करण्यात आली असल्याचे ‘सीबीडीटी’ने म्हटले आहे.

याशिवाय, ‘टॅक्स ऑडिट रिपोर्ट’ सादर करण्याची मुदत आता एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, विविध वित्तीय संस्थांना ‘स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन’ (SFT) सादर करण्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून २०२१ पर्यंतचा अवधी मिळणार आहे. विलंबित किंवा सुधारित स्वरुपात प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची नवी मुदत आता ३१ जानेवारी २०२२ असेल.

tax
बिटकॉईन म्हणजे काय रे भाऊ?

कर अनुपालनासाठीची मुदतवाढ : एका दृष्टीक्षेपात

१) वैयक्तिक करदात्यांचे विवरणपत्र : ३० सप्टेंबर २०२१

२) कंपन्या वा संस्थांसाठीचे विवरणपत्र : ३० नोव्हेंबर २०२१

३) कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देण्याची मुदत : १५ जुलै २०२१

४) टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करणे : ३१ आॅक्टोबर २०२१

५) स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन : ३० जून २०२१

६) विलंबित किंवा सुधारित विवरणपत्र : ३१ जानेवारी २०२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com