पेट्रोल-डिझेलपाठोपाठ PNG-CNG च्या दरातही वाढ; जाणून घ्या नवीन किंमती

Piped Natural Gas
Piped Natural Gasesakal
Summary

IGL ने आज आपल्या ग्राहकांना SMS द्वारे किमतींमध्ये वाढीची माहिती दिलीय.

पेट्रोल-डिझेलनंतर (Petrol Diesel Hike Today) आता पाइप्ड नॅचरल गॅस (Piped Natural Gas, PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed Natural Gas, CNG) ही महाग झाले आहे. IGL ने आज या किंमती वाढवल्याची घोषणा केलीय. IGL ने माहिती दिलीय की, PNG च्या किमतीत प्रति SCM 1 रुपये (किंमत वाढ), तर CNG ची किंमत 50 पैशांनी वाढलीय. गॅसच्या वाढत्या किमतींमुळं ही वाढ करण्यात आल्याचं कंपनीनं म्हंटलंय. नवीन किंमती आज 24 मार्चपासून लागू होतील. रशिया-युक्रेन युध्दामुळं (Russia-Ukraine War) इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पीएनजीच्या किंमतीपूर्वी सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) किमतीत वाढ झाल्यामुळं इंधनाच्या दरातही वाढ दिसून आलीय.

IGL ने आज आपल्या ग्राहकांना SMS द्वारे किमतींमध्ये 1 रुपये प्रति SCM वाढीची माहिती दिलीय. आजच्या वाढीसह गौतम बुद्ध नगरमध्ये PNG चे दर 35.86 रुपये प्रति SCM झालेत. त्याचवेळी गाझियाबादमध्ये पीएनजीचे दरही त्याच पातळीवर वाढलेत. तर, दिल्लीत किंमती 36.61 रुपये प्रति SCM वर पोहोचल्या आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात पीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. जानेवारीमध्ये कंपनीनं प्रति SCM 50 पैशांनी वाढवले ​​होते.

Piped Natural Gas
Petrol-Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ

पीएनजीच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाल्यानं एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात आधीच वाढ झालीय. मार्च महिन्यात तब्बल 4 महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. या काळात पेट्रोल दीड रुपयांनी महागले असून घाऊक दरात लिटरमागे 25 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. यासोबतच दिल्ली-एनसीआरसह सर्व महानगरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झालीय.

Petrol-Diesel Price Today 24 March : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतींत वाढ झाल्यानंतर आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. आज पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नसून दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेल (Diesel Price) च्या किमतींमध्ये 80 पैशांहून अधिक वाढ केली होती. या दोन दिवसांत देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 1.60 रुपयांनी महागलं होतं. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे तेल कंपन्यांवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी तेलाच्या किरकोळ किंमती वाढवण्यास सुरुवात केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com