esakal | निर्देशांकांचा चढउतार, सेन्सेक्स 53 हजारांजवळ
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

निर्देशांकांचा चढउतार, सेन्सेक्स 53 हजारांजवळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - कोणतेही मोठे सकारात्मक किंवा नकारात्मक संकेत नसल्याने आज निर्देशांकांनी चढउतार अनुभवले. मात्र, दिवसअखेरीस दोन्ही भारतीय निर्देशांक पाव टक्का वाढ दाखवीत बंद झाले. सेन्सेक्स 53 हजारांजवळ (52,904) गेला तर निफ्टीही 15,853 वर स्थिरावली. (Index fluctuates Sensex near 53 thousand)

हेही वाचा: झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद

त्रेपन्न हजारांच्या टप्प्यात असलेला सेन्सेक्स आज सकाळी 52,800 अंशांवर उघडला. मात्र, लगेच नफावसुलीमुळे घसरून 52,611 पर्यंत घसरला, पण तितक्याच वेगाने तो सावरून त्याने जवळपास त्रेपन्न हजारांना स्पर्श करताना 52,978 चा आजच्या दिवसाचा उच्चांक नोंदवला. त्यानंतर त्या स्तरावर न टिकता 52,904 वर दिवसअखेरीस बंद झाला. तसेच, सेन्सेक्समध्ये आज 134 अंशांची तर निफ्टीमध्ये 41 अंशांची वाढ झाली.

हेही वाचा: Mumbai Blast : यासिन भटकळसह दोघांवर आरोप निश्चिती

आज टेक महिंद्र, एचसीएल टेक, इन्फोसिस (बंद भाव 1,576 रु.), लार्सन टुब्रो (1,544 रु.) हे समभाग दोन टक्के वाढले. टाटा स्टील (1,244), आयटीसी (204), टीसीएस (3,213) हे एक टक्क्याच्या आसपास वाढले. तर मारुती, हिंदुस्थान युनिलीव्हर, नेस्ले, डॉ. रेड्डी, रिलायन्स (बंद भाव 2,086 रु.), इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज ऑटो या समभागांचे दर अर्धा ते सव्वा टक्का कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे दर

  • सोने - 48,080 रु.

  • चांदी - 69,200 रु.

loading image