
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 2 लाख रुपये गुंतवा, मिळेल मोठा नफा
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme (MIS)) ही एक चांगली सेव्हिंग्स अर्थात बचत योजना आहे. यात तुम्हाला दर महिन्याला एकरकमी पैसे जमा करून इन्कम मिळवता येते. बाजारातील अस्थिरतेचा या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुम्हाला MIS खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्याची परिपक्वता 5 वर्षांची आहे. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न सुरु होईल.
MIS कॅल्क्युलेटर-
एमआयएस कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपये एकरकमी जमा करून हे खाते उघडले, तर मॅच्युरिटीनंतर, पुढील पाच वर्षांसाठी त्याचे वर्षाला 13,200 रुपये मिळतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,100 रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला पाच वर्षांत एकूण 66,000 रुपये व्याज मिळेल. सध्या पोस्ट ऑफिसच्या MIS वर 6.6% वार्षिक व्याज दिले जात आहे.
हेही वाचा: दररोज 50 रुपयाची बचत तुम्हाला येत्या काही वर्षात किती कमाई करुन देईल जाणून घेऊयात...
1000 रुपयांनी सुरु करा खाते-
पीओएमआयएस (Post Office Monthly Income Scheme) योजनेत किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह खाते उघडले जाऊ शकते. सिंगल आणि जॉईंट दोन्ही खाते उघडता येते. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. MIS मध्ये दर महिन्याला व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
हे अकाऊंट अकाली बंद (Premature Closing) होऊ शकते. पण ज्या दिवशी पैसे गुंतवले त्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकता. नियमांनुसार, जर एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले गेले तर डिपॉझिट अमाउंटच्या 2% परत केले जातील. तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षांच्या मुदतीपूर्वी कधीही पैसे काढल्यास, तुमच्या डिपॉजिट अमाउंटपैकी 1% रक्कम कापून परत केली जाईल.
हेही वाचा: भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची; सोल्युशन ओरिएंटेड फंडबाबत जाणून घेऊया
अकाउंट कसे सुरु कराल?-
एमआयएस खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ओळखपत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील. पत्त्याच्या पुराव्यासाठी, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल वैध असेल. हे कागदपत्र घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरावा लागेल. तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरण्यासोबतच नॉमिनीचे नावही द्यावे लागणार आहे. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये कॅश किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: India Post Investment In Monthly Income Scheme Mis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..