भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची; सोल्युशन ओरिएंटेड फंडबाबत जाणून घेऊया

सध्या बाजारात काही खास सोल्युशन ओरिएंटेड फंड (Solution Oriented Fund) आहेत, जे तुमच्या मुलांचे शिक्षण, तुमची सेवानिवृत्ती इत्यादींसाठी तयार केलेले आहेत
Share Market
Share MarketSakal

Solution Oriented Fund Investment Tips: आयुष्यात गुंतवणूक महत्त्वाची आहे. आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक गरजेची आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, सेवानिवृत्ती, आजारपणं या सगळ्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. सध्या बाजारात काही खास सोल्युशन ओरिएंटेड फंड (Solution Oriented Fund) आहेत, जे तुमच्या मुलांचे शिक्षण, तुमची सेवानिवृत्ती इत्यादींसाठी तयार केलेले आहेत.

सोल्युशन ओरिएंटेड फंड म्हणजे काय?
बाजारात गोल ओरिएंटेड फंडांच्या (Goal Oriented Fund) दोन कॅटेगरी असल्याचे ऑप्टिमा मनीचे एमडी पंकज मठपाल म्हणाले. मुलांचे शिक्षण आणि तुमच्या सेवानिवृत्तीच्या नियोजन याचा गोल ओरिएंटेड फंडमध्ये समावेश आहे. हा एक ओपन एंडेड फंड आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

Share Market
ब्रोकरेजने सिमेंट सेक्टरमधला हा शेअर करेल दमदार कामगिरी; तज्ज्ञांना विश्वास

चिल्ड्रन फंड आणि रिटायरमेंट फंड या दोन्हींचा लॉक-इन पिरियड (Lock in Period) 5 वर्षांचा आहे. उदाहरणार्थ, मुलांसाठी निधीची मॅच्युरिटी रक्कम 5 वर्ष किंवा मुलाचे वय पूर्ण होईपर्यंत आणि सेवानिवृत्ती निधीमध्ये मॅच्युरिटी 5 वर्ष किंवा सेवानिवृत्ती, यापैकी जे आधी असेल ती निश्चित केली जाते.

सोल्युशन ओरिएंटेड फंड का?
गोल ओरिएंटेड फंड काही प्रकरणांमध्ये फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये येतात आणि काही फंड हायब्रिड फंडांसारखे काम करतात. या फंड हाऊसेसचे बेंचमार्क निर्देशांकासाठी वेगळे ऍलोकेशन आहे, जे बहुतेक प्रकरणांमध्ये योजना बदलण्याची सोयही आहे. तुम्ही तुमची स्कीम ऑटो स्विच पर्यायाने बदलू शकता.

Share Market
'हा' मल्टीबॅगर स्टॉक फक्त एका महिन्यात 40% वाढला, आणखी तेजी येण्याची शक्यता

रिटायरमेंट फंडचे फायदे-
सोल्यूशन ओरिएंटेड फंड तुम्हाला तुमची सेवानिवृत्तीचे टारगेट पूर्ण करण्यात मदत करतात. लॉक-इन पिरियडमुळे, तुम्ही बाहेर पडू शकत नाही. या फंडांमध्ये वेगवेगळ्या वयासाठी वेगवेगळी ऍलोकेशन स्ट्रॅटेडी आहे. या पॉलिसी तुमच्या नेहमीच्या विमा पॉलिसीपेक्षा अधिक पारदर्शक आहेत.

जर तुमच्या निवृत्तीला 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असेल तर या निधीचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही. लाँग टर्मसाठी इक्विटी पर्याय सर्वोत्तम आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com