दररोज 50 रुपयाची बचत तुम्हाला येत्या काही वर्षात किती कमाई करुन देईल जाणून घेऊयात...| SIP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SIP Investment Tips
दररोज 50 रुपयाची बचत तुम्हाला येत्या काही वर्षात किती कमाई करुन देईल जाणून घेऊयात...| SIP

दररोज 50 रुपयाची बचत तुम्हाला येत्या काही वर्षात किती कमाई करुन देईल जाणून घेऊयात...

म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे, तुम्ही नियमितपणे अगदी छोट्या छोट्या बचतींमधूनही इक्विटीसारखा परतावा मिळवू शकता. त्यात गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे. जर तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर पुढील काही वर्षांत तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. जर तुम्ही दिवसाला 50 रुपये वाचवले आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवले, तर तुम्ही 5, 10, 15, 25 वर्षांत लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्मसाठी सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

चक्रवाढीचे फायदे-
समजा तुम्ही दररोज 50 रुपये वाचवत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. हेच 1500 रुपये तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवले तर त्याचा चांगला फायदा मिळेल. टर्मसाठी एसआयपी ठेवल्याने चक्रवाढीचे प्रचंड फायदे मिळतात. किरकोळ गुंतवणूकदार लाँग टर्मसाठी एसआयपीला प्राधान्य देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

AMFI च्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये SIP कंट्रीब्‍यूशनने 12,327.91 कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गुंतवणुकीसाठी एसआयपी हा बेस्ट पर्याय म्हणून समोर येत आहे.

पद्धतशीर किंवा शिस्तबद्ध गुंतवणूक लाँग टर्मसाठी अधिक फायदेशीर आणि कमी अस्थिर असते असा किरकोळ गुंतवणुकदारांना वाटत असल्याचे एडलवाइज म्युच्युअल फंडाचे हेड (सेल्स) दीपक जैन यांनी म्हटले. त्यामुळे नियमित गुंतवणुकीसाठी ते SIP ला प्राधान्य देत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ परताव्यावर नाही तर तर रिस्‍क एडजस्‍टेड रिटर्नवर असते. यासाठी SIP हा उत्तम पर्याय आहे.

5 वर्षांत अंदाजे परतावा-
समजा तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 1500 ची SIP केली आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 5 वर्षात 1.20 लाखापेक्षा जास्त निधी तयार कराल. यामध्ये तुमची गुंतवणूक 90 हजार रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 33 हजार रुपयांचा चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.

25 वर्षांत अंदाजे परतावा-
समजा तुम्ही दररोज 50 रुपये वाचवत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दर महिन्याला 1500 ची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 25 वर्षात 28.5 लाख पेक्षा जास्त कॉर्पस तयार कराल. यामध्ये तुमची गुंतवणूक 4.5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 24 लाख रुपयांचा लाभ होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :SIPInvestment