येस बँकेत गुंतवणूक केलीय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Yes Bank
Yes Bank

येस बँकेच्या (Yes Bank) शेअर्समुळे गुंतवणूकदारांसाठी डोक्याला ताप झाला आहे. या शेअर्समधून बाहेर पडताही येत नाही आणि ते ठेवण्याचा कोणताही फायदाही होत नाही. मार्च 2019 पासून येस बँकेच्या शेअर्सच्या स्थितीमुळे गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ (Portfolio) अत्यंत खराब झाला आहे. गेल्या वर्षीपासून येस बँकेशी संबंधित चांगल्या आणि वाईट बातम्या सतत येत आहे. आणि आता जी बातमी आली आहे ती त्याच्या रेटिंगवर आली आहे.

Yes Bank
तुमच्या SIP ला द्या Top-Up; फायदा होईल दुप्पट, कॅलक्युलेटर वर करा चेक...

दरम्यान, इंडिया रेटिंग्सने (India Ratings) येस बँकेची दीर्घकालीन इश्युअर बीबीबी रेटिंग कायम ठेवली आहे. या रेटिंगचा अर्थ असा आहे की Balance Sheet वरील बोजा कमी करण्यासाठी बँकेकडे पुरेसे भांडवल आहे. त्याचबरोबर बँकेच्या डिपॉझिट प्रोफाइलमध्येही सुधारणा होत आहे. येस बँकेचा आउटलूक स्थिर आहे.

Yes Bank
परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज

येस बँकेचा कॉमन इक्विटी टियर-1 (CET-1) 2022 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 11.6 टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 13.6 टक्के इतका होता. बँकेकडे 6400 कोटी रुपयांची कर मालमत्ता आहे जी नेटवर्थ काढून CET-1 मधून कमी केला आहे.

तरतुदीसाठी (Provisioning) वापरली जाणारी मालमत्ता विकली गेली आहे किंवा काढून टाकण्यात आली असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. एजन्सीचा असा विश्वास आहे की, स्थगित कर मालमत्ता (Deffered Tax Assets) वापरली जाईल ज्यामुळे CET-1 वाढेल.

Yes Bank
नीरव मोदीची 440 कोटींची जप्त मालमत्ता PNBला परत करण्यास मान्यता

येस बँकेला (Yes Bank) आपल्या सर्वात मोठ्या भागधारक एसबीआयच्या सोबतीची फायदा होईल. एसबीआय मार्च 2023 पर्यंत येस बँकेत किमान 26 टक्के हिस्सा कायम ठेवायचा आहे. ही बँकेच्या पुनर्रचना योजनेचा (Restructuring Plan) एक भाग आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा (SBI) सध्या येस बँकेत 30 टक्के हिस्सा आहे.

Yes Bank
झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?

आर्थिक वर्ष 2022 मध्ये कर्ज वसुलीमुळे (Loan Recovery) येस बँकेचा नफा वाढू शकतो. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 3400 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.12,000 कोटी रुपयांची घसरण हेच या नुकसानीमागचे मुख्य कारण आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेने ग्रॉस एनपीएवर 67 टक्क्यांहून अधिक तरतूद कायम ठेवली होती. तर अनुत्पादक गुंतवणूकीची तरतूद 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com